गणेश जयंतीनिमित्त स्नेहलता कोल्हे यांनी गणरायास केली जनकल्याणाची प्रार्थना

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : श्री गणेश जयंतीनिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील गणेश मंदिरांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. नागरिकांचे जीवन सुखमय व्हावे अशी जणकल्याणाची प्रार्थना केली. नागरिकांशी संवाद साधून श्री गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सर्व संकटांवर मात करून लोकसेवेसाठी ऊर्जा मिळू दे, कष्टकरी शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक व सर्व नागरिकांना सुख, समाधान व निरोगी आयुष्य लाभू दे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊन बाजारपेठेची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी केली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माघ महिन्यातील श्री गणेश जयंती उत्सव मंगळवारी (१३ फेब्रुवारी) कोपरगाव शहरासह सर्वत्र मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री गणेश जयंतीनिमित्त पूजाअर्चा, गणेश याग, आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहरातील श्री ‌विघ्नेश्वर गणेश मंदिर, दत्त नगर, महादेवनगर, गांधीनगर, फादरवाडी‌, बालाजी अंगण येथील श्री गणेश मंदिर, कापड गल्लीतील श्री गोकर्ण गणपती, प्रगत शिवाजी रोड तसेच रेव्हेन्यू कॉलनी येथील श्री गणेश मंदिर आदी विविध मंदिरांना भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा व आरती केली.

तसेच त्यांनी गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून त्यांच्या समवेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी महिलांना वाण वाटप केले. तसेच महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याची ग्वाही दिली. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध ठिकाणी धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करणाऱ्या सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कोल्हे यांनी अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले‌, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगर परिषदेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई‌, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेविका विद्या सोनवणे, सिंधु कडू, शिल्पा रोहमारे,

साई समृद्धी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव आढाव, स्वच्छतादूत सुशांत घोडके, चंद्रशेखर कोहकडे‌, राजेंद्र कोहकडे‌, संदीप लोढा, बाळकृष्ण लावर‌ गुरू, बाळासाहेब कडू, प्रशांत कडू, विक्रमादित्य सातभाई‌, सोमनाथ म्हस्के, सागर गंगुले, रामदास गायकवाड, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे‌, स्वप्नील मंजुळ, सिद्धांत सोनवणे, संतोष कापसे, कुणाल जगताप, माधव काळे, गणेश काळे, राम गंगुले, शरद उपाध्याय, सुनील भारमकर‌, सनी इमाने, बाळू काळे, अक्षय मेहरे आदींसह गणेश भक्त, माता-भगिनी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.