संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मा.बाळासाहेब वाघ अवार्डने सन्मानित

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : संजीवनी ग्रुप ऑफ अन्स्टिट्यूट्सचे (एसजीआय) अध्यक्ष नितिन कोल्हे यांची एसजीआय संचलित संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व पाॅलीटेक्निक संस्थांची देश पातळीवरील विविध उपलब्धी विचारात घेवुन त्यांच्या विशेषतः अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेवुन असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ इंजिनिअरींग काॅलेजेस, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स आणि असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ अॅग्रीकल्चर अँड अलाईड अॅग्रीकल्चर काॅलेजेस (महाराष्ट्र) या तीनही संस्थांच्या वतीने त्यांना पुणे येथे शानदार सोहळ्यात  ‘मा. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड’ ने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रमुख पाहुणे व माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील, चिपळून विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व संघटनेचे अध्यक्ष समीर वाघ यांचे हस्ते कोल्हे यांनी  स्वीकारला. या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्तीमुळे श्री कोल्हे यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नितिन कोल्हे यांनी एसजीआयचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व पाॅलीटेक्निक मध्ये काळानुरूप अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते यशस्वी करून दाखविले. यात प्रामुख्याने उद्योग आणि तांत्रिकी शिक्षण यांच्यातील दुरी भरून काढण्यासाठी व समन्वय साधण्यासाठी संजीवनी इंनिनिअरींग काॅलेजला २०१९ साली ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करून ग्रामीण भागातील दुसरे व उत्तर महाराष्ट्रातील ते पहिले ऑटोनॉमस काॅलेज ठरले.

त्यामुळे उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या आधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश अभ्यासक्रम रचनेत करण्यात आला. शैक्षणिक वर्ष  २०२२-२३ मध्ये पहिली ऑटोनॉमस बॅच बाहेर पडली. यात महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने तब्बल ७७० नवोदित अभियंत्यांना रू २० लाख वार्षिक पॅकेज पर्यंतच्या नोकऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये देण्यात आल्या. यापुर्वीही ग्रामीण भागातील अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या बहुराष्ट्रीय  कंपन्यंमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

संजीवनी पाॅलीटेक्निकनेही नितिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कीर्तिमान स्थापित केले आहेत. यात संजीवनी पाॅलीटेक्निकने नॅशनल बोर्ड ऑफ  अॅक्रिडीटेशन, नवी दिल्ली कडून सलग ९ वर्षे एनबीए हे सर्वोच्च मानांकन प्राप्त करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. तसेच एआयसीटीईने या पाॅलीटेक्निकला इतर पाॅलीटेक्निक्सला एनबीए मानांकन प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये मेंटाॅर इन्स्टिटयूट म्हणुन नेमणुक केली.

२०२१ मध्ये मेंटाॅर इन्स्टिट्यूट्सचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील हे पहिले पाॅलीटेक्निक ठरले. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यातही आघाडी घेतली आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने आपल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक घडामोडींचे अवलोकन होवुन त्यांच्यात बदल घडवुन आणन्यासाठी अनेक परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत.

या सर्व गोष्टींचा परीपाक म्हणुन नितिन कोल्हे यांना समीर वाघ यांच्या अध्यक्षते खालील राज्यस्तरीय विनाअनुदानित अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि कृषी व कृषी संलग्न महाविद्यालये या तिन्ही राज्यस्तरीय असोसिएशनने त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना  ‘मा. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड’ ने सन्मानित केले.