जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने शेतकऱ्याना बँकेच्या विविध योजनांची माहिती

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : तालुक्यातील आदर्श गाव वाघोली व जिल्हा सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने आर्थिक व साक्षरता व घर घर के.सी.सी अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बँकेच्या विविध योजनांची, सोयी सुविधाची, किसान क्रेडिट कार्ड, एक रकमी कर्ज परतफेड योजना, एटीएम कार्ड, शेतकऱ्यांसाठी पिक विमा या सर्व बाबींची माहिती देण्यात आली.

लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव आंधळे, वाघोली संस्थेचे चेअरमन भरत वांढेकर, पंडित भालसिंग, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, कार्यालयीन अधीक्षक कोठुळे, इन्स्पेक्टर भुसारी, ढोरजळगाव शाखेचे शाखाधिकारी पाटील, इन्स्पेक्टर चौधर, वाघोली संस्थेचे सचिव मोरे भाऊसाहेब, दिलीप भालसिंग, संचालक योगीराज आव्हाड, अमोल आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, दिलीप आव्हाड, मल्हारी आव्हाड, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड.गोरक्षनाथ जमधडे यांनी आभार मानले.