बापूसाहेब लोढे यांना उत्कृष्ट मराठी अध्यापन पुरस्कार प्रदान

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था आयोजित जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘मराठी भाषा गौरव दिना’ निमित्त दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन श्रीरामपूर येथे नुकतेच पार पडले.

यावेळी मराठी भाषेच्या निरंतर सेवा, प्रचार व संशोधन कार्यातील योगदाना बद्दल शेवगाव तालुक्यातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, दहिगावने येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील
मराठीचे शिक्षक बापूसाहेब लोढे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार’ सन २०२३-२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदिप सांगळे, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, समीक्षक मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा.डॉ .वसंत शेंडगे, माजी प्राचार्य चंद्रकांत कर्डक यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला.

यावेळी पर्यवेक्षक सुरेश शेरे, देवराम सरोदे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, राजेंद्र पानगव्हाणे, मोहन उंडे, संतोष देशमुख, अप्पासाहेब खंडागळे, प्रकाश मरकड आदि उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले, सचिव माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, माजी सभापती डॉ.क्षितिज घुले, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी के.वाय.नजन, विद्यालयाचे प्राचार्य सुनिल शिंदे, प्राचार्य डॉ.शरद कोलते, उपप्राचार्य आप्पासाहेब म्हस्के, सरपंच सुनिता कांबळे, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांनी त्यांचे अभिनंदन केले.