कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून सुहास जगताप रूजू

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोपरगाव नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून सुहास जगताप यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला आहे. तर तत्कालीन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची यापुर्वीच जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी नगरपंचायत येथे बदली झाली होती. माञ, गोसावी यांनी तिर्थपुरी नगरपंचायतचा पदभार न स्वीकारता कोपरगाव नगरपालिकेच्या कारभार पहात होते.

कोपरगाव नगरपालिकेला नवे मुख्याधिकारी बदलून आले नसल्याने शांताराम गोसावी यांनी आपला पदभार सोडला नव्हता. बदली झाली तरी ते घरी बसुन पालिकेचा कार्यभार सांभाळुन कर्तव्य बजावत असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. अखेर मंगळवारी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त सुहास जगताप यांनी कोपरगावच्या पालिकेचा कार्यभार स्विकारले आणि शांताराम गोसावी यांनी आपला पुढचा रस्ता धरला. 

सुहास जगताप यांनी १४ वर्षे शासकीय सेवा बजावली आहे. त्यांनी नगर जिल्ह्यातील जामखेड नगरपंचायत, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, पुणे महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका येथील कामाचा मोठा अनुभव असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीकडे कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे. 

कोपरगाव शहराची मुख्य समस्या पिण्याचे पाणी आहे तसेच रस्ते, गटारी, उद्याने, अतिक्रमणे, सांडपाणी प्रकल्प, शहर सुशोभीकरणासह अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या कोपरगाव शहराला नवे मुख्याधिकारी सुहास जगताप कसे बाहेर काढतात की मागचे पाढे पंचावन्न म्हणत आपला कार्यकाळ पुढे ढकलतात यांची उत्सुकता कोपरगाकरांना लागली आहे.

दरम्यान सुहास जगताप यांनी कोपरगाव नगरपालिकेचा कार्यभार स्विकारल्याचे समजताच विविध क्षेञाती मान्यवर, पालिकेचे ठेकेदार, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे स्वागत करुन खास शैलीत ओळख करुन घेत आहेत. मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी व ओळख करुन घेण्यासाठी त्यांच्या दालनासमोर रिघ लागत आहे.