कोपरगाव मतदार संघाच्या अल्पसंख्यांक विकासासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : – महायुती शासनाकडे मतदार संघाच्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावला जावा. यासाठी अल्पसंख्याक क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी मिळावा. यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून मतदार संघासाठी २.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील साडे चार वर्षात मतदार संघाचा विकास साधताना समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विकास सर्वदूर पोहोचविला आहे. त्याप्रमाणे मतदार संघाच्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचावले जावून त्यांना देखील विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावास महायुती शासनाने मान्यता देताना मतदार संघातील २० गावांसाठी एकूण २.६० कोटी निधीस मंजूरी  देण्यात आली आहे.

या निधीतून मतदार संघातील भोजडे येथील मुस्लिम कब्रस्तान सुशोभीकरण करणे व हायमॅक्स बसविणे (१० लक्ष), मुर्शतपुर येथील कब्रस्तान संरक्षक भिंत व गेट बांधणे (१० लक्ष), धामोरी येथील मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे (१५ लक्ष), शिरसगाव येथील मुस्लिम कब्रस्तान सुशोभिकरण करणे (१०लक्ष), सोयगाव येथील मुस्लिम कब्रस्तान सुशोभीकरण व संरक्षक भिंत बांधणे (२० लक्ष), वारी येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभिकरण करणे (२० लक्ष), घारी येथील मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे (१५ लक्ष),

 मळेगाव थडी येथील मुस्लिम कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधणे (२० लक्ष), मढी बु. येथील मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंड करणे (१० लक्ष), ब्राम्हणगाव मुस्लिम कब्रस्तान येथे शेड व वॉल कंपाऊंड बांधून सुशोभिकरण करणे (१०लक्ष), कोळपेवाडी येथील मुस्लिम वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लक्ष), चांदेकसारे मुस्लिम कब्रस्तान सुशोभिकरण करणे (२० लक्ष), सुरेगाव येथील मुस्लिम कब्रस्तान सुशोभिकरण करणे (१०लक्ष), कोकमठाण येथील मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंड बांधणे मस्जिद परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (१५ लक्ष), धोत्रे येथील शेख वस्ती जवळ खडीकरण करणे(१० लक्ष), धारणगाव येथील मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंड करणे व सुशोभिकरण करणे (१५ लक्ष),

चितळी येथील कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधणे पेव्हर ब्लॉक बसविणे (१०लक्ष), जळगाव येथील मासूमबाबा दर्गा मस्जिद जवळच्या परिसरात संरक्षक भिंत बांधणे पेव्हर ब्लॉक बसविणे (१०लक्ष), करंजी येथील मुस्लिम कब्रस्तान सुशोभिकरण करणे (१० लक्ष), वाकडी येथे अल्ताफ तांबोळी घर ते आलम तांबोळी घर रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष) आदी अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या विकासासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, अल्पसंख्यांक विकास मंत्री ना.अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहे. तर या वीस गावासह मतदार संघातील सर्व मुस्लीम बांधवांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.