शेवगाव-पाथर्डी नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी २५ कोटी रूपयांचा निधी – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : महाराष्ट्र राज्य सरकारचे वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत शेवगाव नगरपरिषद व पाथर्डी नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी २५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली आहे.

या निधीमुळे शेवगाव-पाथर्डी शहरांच्या विकास कामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून त्यासाठी आ.राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. या मंजूर निधीमध्ये दोनही शहरातील कॉक्रीट रस्ते, बंदीस्त गटार, स्ट्रीट लाईटची कामे, पेव्हींग ब्लॉक, रस्ते खडीकरण डांबरीकरण, सभामंडप आदी कामांचा समावेश आहे.

शेवगाव नगरपरिषद अंतर्गतील वार्ड क्र.१६ येथे आहिल्याभवन सभागृह बांधणे रु.२० लक्ष, मिरी रोड ते कारखेले घर पेव्हींग ब्लॉक बसविणे रु.४० लक्ष, विद्यानगर येथे विठ्ठल-रुख्मीणी मंदिराजवळ प्रवेशद्वार बांधणे रु.११ लक्ष, वृंदावन गार्डन ते मारुती मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु.३० लक्ष, वृंदावन गार्डन येथे आरओ प्लॅन्ट व सेड करणे रु.१२ लक्ष, पांडूरंग आश्रम गोशाळा पैठण रोड येथे सभामंडप बांधणे रु.१५ लक्ष, खंडु शिंदे निवास ते करवंदे निवास पर्यंत भुमीगत गटार बांधणे रु.५ लक्ष, गोधणे डॉक्टर निवास ते परदेशी डॉक्टर निवास भुमीगत गटार बांधणे रु.३ लक्ष, मिरी रोड ते विट्ठल देवढे निवास रस्ता व भुमीगत गटार बांधणे रु.२५ लक्ष,

संतोषी माता मंदिर शास्त्रीनगर येथे सभामंडप बांधणे रु.१५ लक्ष, जोशी घर ते दौंड घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.३० लक्ष, जोशी सर निवास ते शशि काळे निवास रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.१५ लक्ष, मारुती मंदिर (मिळकत नं. ४००९) सभामंडप बांधणे रु.१५ लक्ष, प्रभाग क्र.१० आयेशानगर येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे रु.३० लक्ष, वसंत लांडे निवास ते जोग निवास भुमीगत गटार बांधणे रु.१० लक्ष, देशमुख निवास ते रविबापू पवार निवास भुमीगत गटार बांधणे रु.५ लक्ष, स्ट्रीट लाईट फेज बसविणे रु.८० लक्ष, श्रीराम कॉलनी येथील राजु कुसळकर घर ते राजु इंदे घर व गणपती मंदिर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे रु.२५ लक्ष, बॉम्बे मशिनरी स्टोअर्स ते लांडे वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु. ११०० लक्ष, आखेगांव रोड ते कोरडे वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु.८०लक्ष, म्हसोबानगर ते खालची वेस नाला गटार बांधकाम करणे. रु.५० लक्ष,

म्हसोबानगर ते खालची वेस रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु.४० लक्ष, मिरी रोड (मारुती मंदिर) ते जिल्हा परिषद शाळा कर्डीले वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५०० मीटर रु.३० लक्ष, स्वप्नील सुपारे निवास ते भैय्या सय्यद निवास रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. ४०लक्ष, सर्जे वस्ती ते ग्रामीण रुग्णालय रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु. ६० लक्ष, तेलंगी माता मंदिराजवळ सभामंडप बांधणे रु. १५ लक्ष, खुंटेफळ रोड ते बाळासाहेब गोरे घर रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे रु. १० लक्ष, आखेगांव रोड ते झिरपे घर निवास पेव्हींग ब्लॉक बसविणे रु. १५ लक्ष,

मगर वस्ती ते नेवासा रोड खडीकरण डांबरीकरण करणे रु. ४० लक्ष, शेळके निवास ते हमसफर टेलर निवास पेव्हींग ब्लॉक बसविणे रु. १५ लक्ष, महादेव देवस्थान (माळेगांव) समोरील जागेत पेव्हींग ब्लॉक बसविणे रु. ४० लक्ष, तेलंगी माता मंदिर ते दिलीप डाके घर रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे रु. १० लक्ष, महालक्ष्मी जिनींग रोड ते विजय कोरडे घर रस्ता खडीकरण करणे रु. १० लक्ष, मिरी रोड ते अर्जुनराव काळे घर (नेवासा रोड कडे) रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. ४० लक्ष या कामांचा समावेश आहे.

पाथर्डी नगरपरिषद अंतर्गत जैन विद्यालय मागील बाजू ते जॉगींग पार्क गटार (नाला) बांधकाम करणे रु. 6 कोटी, उबाळे, दौंड, व गुगळे घर परिसर, आई कॉम्युटर परिसर, बडे, ते काळोखे सर ते वसंत खेडकर सर घर बंदीस्त पाईप गटार, रस्ता खडीकरण व कॉक्रीटीकरण करणे. रु. 47 लक्ष, बोरा ते जेधे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 26 लक्ष, आनंदनगर मधील मुख्य गायछाप रस्ता ते वामभाऊ मंदिर पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 50 लक्ष,  नाथनगर मुख्य रस्ता ते पुजा टायर्स पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 20 लक्ष, वामनभाऊनगर येथील आंधळे गुरुजी ते बारगजे घर ते बोरुडे सर्व्हीस सेंटर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 30 लक्ष,

एडके कॉलनी (माणिकदौंडी रोड) एडके ते संदीप काकडे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु. 100 लक्ष, सोपान बालवे  ते उत्तम बालवे घरापर्यंत खडीकरण व मजबुतीकरण व सिडीवर्क करणे रु. 30 लक्ष, विष्णु बोरुडे घर परिसर, संगमेश्वर मळा येथे बंदीस्त पाईप गटार व रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 20 लक्ष, काळे वस्ती ते भापकर वस्ती रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे रु. 10 लक्ष, दर्शन मशिनरी ते जॉगीग पार्क भुमीगत गटार करणे रु. 40 लक्ष, आनंदनगर मधील ओम शांती सेंटर समोरील ओपन स्पेसला कंपाऊड व पेव्हींग ब्लॉक कामे करणे रु. 20 लक्ष,

वामनभाऊनगर येथील रुपाली टेलर ते विशाल रोकडे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 20 लक्ष, वामनभाऊनगर येथील पानसंबळ किराणा ते डॉ. वाघ ते सिध्देश्वर घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 23 लक्ष, संजय खोले घर ते देविदास मोरे घर रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे रु. 20 लक्ष, टिपरे घर ते शेवगांव रोड रस्ता कॉक्रीटीकरण करणे.रु. 20 लक्ष, जुना खेर्डे रोड ते राष्ट्रीय महामार्ग 61 ते बालवे वस्ती (जुना खेर्डे रस्ता) पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.रु. 80 लक्ष, काळे वस्ती मधील भुमीगत गटार व रस्ता कॉक्रीटीकरण करणे.रु. 20 लक्ष, घनकचरा ते आहिल्यानगर रस्ता खडीकरण मजबुतीकरण करणेरु. 50 लक्ष,

शेवगांव रोड ते बसवेश्वरनगर रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 50 लक्ष, शिवशक्तीनगर रस्ता कॉक्रीटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसविणे रु. 80 लक्ष, वामनभाऊनगर मधील शिंदे भाऊसाहेब घर ते कराड सर घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 15 लक्ष, वामनभाऊनगर मधील मुख्य रस्ता ते रविंद्र गर्जे सर घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. 15 लक्ष, शेवगांव रोड ते चितळे वस्ती ते परदेशी वस्ती रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे रु. 20 लक्ष,  पैठणकर घर परिसर येथे बंदीस्त गटार करणे. रु. 10 लक्ष, प्रविण बोडखे घर ते गर्जे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु. 10 लक्ष, वामनभाऊनगर येथील जगदीश पातकळ घर ते जायभाय घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु. 15 लक्ष,

प्रमोद निऱ्हाळी ते प्रदिप निऱ्हाळी घर तसेच देविदास पारखे ते कोष्टी घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 10 लक्ष, जुनी इंदिरा टॉकीज ते शेवगांव रोड पर्यंत भुमीगत गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 20 लक्ष, मोहटादेवी रोड ते विजय बोरुडे घर सिडीवर्क करणे व तनपुरवाडी मधील शाळेला वॉलकंपाऊड करणे रु 13 लक्ष, चिंचपुर रोडवरील चैतन्य हनुमान बागेला वॉलकंपाऊड करणे रु. 20 लक्ष, प्रभाकर पवार घर ते शेवगांव रोड रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लक्ष  रूपयांचे कामांचा समावेश आहे. ही कामे संबंधित नगरपरिषद कार्यान्वित यंत्रणेमार्फत करावयाची असून मंजूर करण्यात आलेले कामांची तात्काळ निविदा प्रक्रिया करुन कामे सुरु करणेसाठी सूचना दिलेल्या आहेत.