पत्रकार गायकवाड यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृति उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि.०२ :  श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुका परिवारातील पत्रकार चंद्रकांत गायकवाड यांना बाळशास्री जांभेकर स्मृती उत्कृस्ट पत्रकारीता पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या प्रित्यर्थ सोमवारी (दि.१) श्रीरेणुका देवस्थानात रेणुका परिवाराच्या वतीने श्रीरेणुका मल्टी स्टेट संस्थेचे प्रवर्तक जेष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रशांत भालेराव, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन पेढा भरवून हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी रेणुका परिवारातील प्रा.जनार्दन लांडे, डॉ.अरविंद पोटफोडे, बाळासाहेब चौधरी, गणेश गरड उपस्थित होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती अंतर राष्ट्रीय पत्रकार संघ नासिकच्या वतीने पत्रकार दिनाचे पार्श्वभूमीवर पत्रकार गायकवाड यांना सात जानेवारीला पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा.श्रीरंग बारणे, आ.प्रसाद लाड, आ.प्रशांत ठाकुर, शेकापचे जेष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, संपादक विवेक म्हात्रे, आदीच्या हस्ते या  पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी पत्रकारा सह सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील सत्तर व्यक्तींना सन्मानीत करण्यात येणार आहे.