अभिषेक आव्हाड यांनी दिला उबाठा शिवसेनेच्या विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : कोपरगाव तालुक्यातील उबाठा सेनेच्या नितीन औताडे, बाळासाहेब रहाणे, संजय गुरसळ यांच्या राजीनाम्या नंतर काल पुन्हा उबाठा शिवसेनेच्या कोपरगाव विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा अभिषेक राजेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. उबाठा सेनेच्या राजीनामाचे सत्र सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र मातोश्री येथे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहे. बाल शिवसैनिक पासून ते उबाठा शिवसेनेत कार्यरत होते. युवा सेनेच्या तालुका प्रमुख पदी असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात तरुणांचे संघटन करून पक्षाची ताकद वाढवली होती‌. कोपरगाव येथील युआरच्या महाविद्यालयीन निवडणुकीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूकीत विजयी केले होते.

कोपरगाव शहरासह तालुक्यात त्यांची वेगळी ओळख आहे. खा. सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कामात आपला ठसा उमटवला आहे.

नितीन औताडे यांचे ते खंदे समर्थक असल्याने त्यांनीही उबाठा सेनेला राम राम ठोकला आहे. राजीनाम्या बाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन आमचे मार्गदर्शक नितीन औताडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला सर्वांना बरोबर घेत काम करण्याची त्यांची पद्धत मला भावली असून मी देखील माझ्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.