मा. आमदार कोल्हेनी निधी दिला तर नाहीच, पण तो पळविला – विजय वहाडणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : विकास निधी देतांना कुठलाही दुजाभाव नको. एका युवा नेत्याने आम्हाला जाणीवपूर्वक विकास निधी दिला जात नाही, दुजाभाव केला जातो हा विषय घेऊन शिर्डी येथे आंदोलन केले.

याच नेत्याच्या मातोश्री ही तालुक्याच्या आमदार होत्या. मी २०१६ ला कोपरगाव शहराचा लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो. कोपरगावच्या नागरिकांनी मला नगराध्यक्षपदी निवडून दिले. या रागातून आ.ताईंनी कोपरगाव नगरपरिषदेला एकही रुपया निधी मिळू दिला नाही. त्याउलट मी प्रयत्नपूर्वक मिळविलेला 2कोटी रु.निधी ही (विशेष रस्ता अनुदान) त्यांनी पदाचा गैरवापर करून PWD कडे वळविला म्हणून त्या विषयात मला उच्च न्यायालयातही जावे लागले.

मी ना.विनोद तावडे यांना भेटून बंदिस्त नाट्यगृहासाठी २ कोटी रु.निधी आणला. पण त्यासाठी प्रयत्न करूनही जागा उपलब्ध झाली नाही. वापर न झालेला तो निधी परत जाऊ नये. यासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना भेटून मी तो २ कोटी रु.निधी न.प.कार्यालय बांधकामासाठी वापरण्याची परवानगी मिळविली. कोपरगाव शहराला विकासनिधी मिळावा यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत वारंवार न चुकता मुंबईला जाऊन मंत्रालयात प्रयत्न करायचो.पण ताईंनी पदाचा गैरवापर करून सातत्याने अडथळे आणले.

२ वर्ष कोरोनामुळे वाया गेले. तरीही मी इतरांपेक्षा जास्त विकासकामे केली. तशी पुस्तिका मी प्रसिध्द केली. कोपरगाव नगरपरिषदेच्या 28 विकासकामांना न्यायालयातून स्टे आणणारेच आज विकास निधीसाठी आंदोलन करता आहे. कोल्हे गटाचे सर्व नगरसेवक, स्वतः आमदार ताई व संजीवनीचे अनेक दूत यांनी मला सातत्याने अडथळेच आणले. माझे सहकारी गायकवाड यांच्या जागेबाबतचा कायदेशीर ठराव कोल्हे गटाने बहुमताच्या जोरावर मंजुरच होऊ दिला नाही.

भय्यासाहेबांना भेटून घ्या. ठराव मंजूर करू अशी भाषा त्यांनी वापरली. त्यांनी स्वतःच्या प्रभागातील विकासकामे व्हावीत म्हणून तरी ठराव मंजूर होऊ दिले हे जनतेचे नशीबच म्हणावे लागेल. मला नगरपरिषद कारभारात अडथळे आणले नसते तर २०१९ मध्ये भाजपाचा एक आमदार नक्कीच वाढला असता. मात्र २०१९ मध्ये आशुतोष काळे आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळाला हे मान्यच करावे लागेल.

हा मजकूर वाचून आम्हीच निधी आणला होता असाही दावा ते करणारच. कारण सगळ्या जगाचे कल्याण होईल इतकी निवेदने-पत्र संजीवनीच्या यंत्रणेने देऊनच ठेवलेली असणार कुठलेही काम मंजूर झाले कि लगेच जुनेच निवेदन प्रसिध्द करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते नेहमीच करतात हे जनतेला चांगलेच माहित आहे.

मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मा.आ.ताईंनी कोपरगाव नगरपरिषदेस किती निधी दिला व आ.आशुतोष काळे यांनी किती रुपये विकास निधी मिळवून दिला हे दोघांनीही जाहीर केले तर जनतेलाही सत्य काय ते कळेल. माझ्या कार्यकाळात ५ नंबर साठवण तलाव काम सुरू झाले व आ.आशुतोष काळे यांच्यामुळेच भरघोस निधी मिळाला व महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचेमुळेच MIDC मंजूर झाली हे तर जगजाहीरच आहे. ताई तुमचे असे कोणते ठोस काम आहे हे ही सांगितले तर बरे होईल निळवंडेची पुंगी वाजवून मतदारांना नादी लावले. पण त्याचे पुढे काय झाले?