सेवानिवृत्त अभियंता अशोकराव वाणी यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८: कोपरगाव नगरपालीकेच्या बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता व योगेश वाणी यांचे वडिल अशोकराव भागुजी वाणी यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान २९ फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा वाणी, मुलगा योगेश वाणी, मनिषा राहुल आवारे, शितल विरेंद्र शिंदे या दोन मुली, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व. अशोकराव वाणी यांच्या निधनाची वार्ता समजताच आमदार आशुतोष, माजी आमदार अशोकराव काळे यांनी शोक व्यक्त केला आहे. स्व.वाणी यांच्या निधनाने संपूर्ण कोपरगावमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

शनिवार दि. 9 मार्च 2024 रोजी कोपरगाव अमरधाम येथे सकाळी 9 वा. दशक्रियाविधी होणार आहे.