कोपरगावचे दोन लाचखोर पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला गुन्ह्यांमध्ये आरोपी न करण्याच्या बदल्यात १५ हजारांची लाच मागितले आणि त्या लाचेचे पैसे स्विकारतान नासिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 या घटनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या काळातील मारामारीच्या जुन्या गुन्ह्यात एकाला आरोपी करण्याची धमकी पोलीसांनी दिली. संबंधीत गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी संतोष रामनाथ लांडे यांच्याकडे असल्याने त्यांनी संबंधीत व्यक्तीला म्हणाले की, जर तुला आरोपी होण्यापासून मुक्ती हवी असेल पोलीस कर्मचारी राघव छबुराव कोतकर यांना भेटून घे असे सांगितले त्या प्रमाणे पोलीस कर्मचारी राघव कोतकर यांना भेटले असता त्यांनी ६ मार्च रोजी १५ हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडी अंतिम १२ हजार देण्याचे ठरले. संबंधीत व्यक्तीने नासिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन लाचखोर दोन पोलिसांची तक्रार केली. नासिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी, विलास निकम यांनी नासिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७ मार्च रोजी दुपारी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सापळा लावून लाच घेणारा पोलीस कर्मचारी राघव कोतकर याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगे हाथ पकडले. कोणाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली त्यालाही लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडून दोघांना गजाआड केले. 

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक थेट पोलीस स्टेशनमध्ये सापळा लावून दोन पोलीसांना पकडत होते. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या दालनात काम करीत होते. तरीही त्यांना काही समजण्याच्या आतच ही कारवाई करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आपली चतुराईने दाखवत लाचखोर पोलीसांच्या मुसक्या आवळल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने कोपरगाव तालुक्यासह पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.