आखेगाव विकास कामात भ्रष्टाचार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील आखेगाव  ग्रामपंचायतीने  केलेल्या विविध विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने त्या अपहाराच्या कामाची चौकशी करावी. अशी मागणी गटविकास अधिकारी राजेश कदम यांचे कडे एका निवेदना द्वारे तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

   निवेदनावर रविंद भाऊसाहेब ससाणे, घनशाम विठ्ठल पायघन, अरुण दामू खर्चन, संजय श्रीधर पायघन, बाबासाहेब कारभारी गोर्डे, भगवान लक्ष्मण कोल्हे, भानुदास विश्वनाथ नाचण, रामकिसन बाबुराव दातीर, लक्ष्मण खंडू गवळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहया आहेत.       

यावेळी आखेगाव तितर्फा येथील रामकिसन बाबुराव दातीर यांना सरपंच अयोध्या शंकर काटे यांचे पती शंकर मनोहर काटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवीगाळ व धमकी दिली. याची व्हिडीओ क्लिप देखील चौकशी साठी सादर करण्यात आली असून  ग्रामपंचायत हद्दीमधील बिहार पॅटर्नमध्ये रोजगार हमी योजने मधील सरपंच यांच्या घरातील व्यक्तीची नावे टाकून काम न करता रोजगार हमीचे पैसे काढले.

सोमठाणे रोड दलित वस्ती साठी क्रीडा विभाग (समाज कल्याण विभाग) यांच्या कडून काही व्यायाम साहित्य आले असता आणि ते दलित मध्ये बसवलेले असताना ते परस्पर सरपंच अयोध्या काटे आणि त्यांचे पती शंकर काटे यांनी खाजगी शिक्षण संस्था चालकाशी चीरीमिरी व आर्थिक व्यवहार करून न्यू इंग्लिश स्कूल आखेगाव ता. शेवगाव या ठिकाणी बसवण्यात आले आहे याची  पाहणी करून कारवाई करण्यात यावी.

१५ व्या वित्त आयोगाचे काम दलित वस्ती मधील रस्ता काँक्रीटकरण न करता परस्पर बिल काढले ( गौतम ससाणे यांच्या घरापासून ते लेंडीनाला पर्यंत ) चोपन वस्ती येथील सरकारी जागेत घरकुल आणि काही वस्तीपट हे येथे ३० ते ४० वर्षा पासून राहत असून त्यांना परस्पर सरपंचाच्या पतीने आणि सरपंच यांनी शासकीय कोणतेही आदेश नसताना त्याना नोटीस काढून त्यांच्याकडून आर्थिक मागणी व शिवीगाळ करत त्यांना धमकावत आहेत.

याची पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी नम्र विनंती करण्यात आली असून येत्या ७ दिवसात याबाबत कारवाई झाली नाही तर सर्व गावकरी पंचायत समितीच्या कार्यालया समोर कोणतीही पूर्व सूचना न देता आमरण उपोषण करण्यात येईल, असे नमुद करण्यात आले आहे.