नागरीकांना स्वस्त दरात वाळु मिळण्यासाठी प्रयत्न करणार – महसूल मंञी विखे 

Mypage

 जिल्ह्यातीला आठ वाळु डेपोचे झाले उद्घाटन

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ :  राज्यातील नागरीकांना अतिशय स्वस्त सहज वाळू उपलब्ध व्हावी यासाठी वाळू विक्रीत अधिक पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे. घरकुल व शासकीय कामासाठी भविष्यात मोफत वाळू देण्याची व्यवस्था करणार असे मत राज्याचे महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  व जिल्ह्यातील आठ वाळू डेपोचा शुभारंभ महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र राज्य महानंद दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हाधिकारी सिध्दाराम  सालिमठ, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक बापू साहेब नागरगोजे, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, तहसीलदार संदीप कुमार भोसले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, राजेंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी विखे ऑनलाईन बोलत होते.

Mypage

विखे बोलताना पुढे म्हणाले की, आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने माहेगाव देशमुख येथे अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्र व आठ वाळू डेपोच्या शुभारंभ करता आला. आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला कर्तृत्ववान व गतिमान नेतृत्व मिळाले आहे. मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे  तालुक्याचा कायापालट होण्यास विलंब लागणार नाही. राज्य सरकार कडून जे जे सहकार्य पाहीजे ते ते मी काळेंना देवून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहुन त्यांच्या विकास कामांच्या सर्व योजना पुर्णत्वास जातील अशी खाञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

Mypage

 यावेळी आमदार आशुतोष काळे बोलताना म्हणाले की, महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या पाठी मागे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे  कोणतीही अडचण येणार नाही. राजेश परजणे यांचा आशीर्वाद व विखे पाटील यांची साथ आहे.  मी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात एमआयडीसी यावी या साठी वेळोवेळी प्रयत्न करीत होतो.  माझे प्रयत्न व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रेटा कामाला आला म्हणून एमआयडीसी मंजुर झाली.

Mypage

परंतू  लोकांना खोटं बोल पण रेटून बोल हि परंपरा असल्याने दुसऱ्यांचे श्रेय घेवून कशातच काही नाही तरी सत्कार करुन घेणे. खोट्या बातम्या पसरवणे  हि त्यांची जूनी परंपरा चालुच आहे.  अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही असे म्हणत कोल्हे यांच्यावर काळे यांनी निशाणा साधला. काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघात विविध विकास कामांना गती दिली असुन टप्प्या टप्प्यात कामे पुर्णत्वाकडे जात आहे, असेही म्हणाले. 

Mypage

 या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाळू डेपो शुभारंभ, माहेगाव देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन, घंटा गाडी लोकार्पण व वृक्षारोपण करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मच्छिंद्र बर्डे, छबुराव आव्हाड, डॉ. अतिश काळे, संभाजी काळे, अर्जून काळे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागली मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Mypage

  तालुक्यात सहाशे रुपये ब्रासने वाळू विक्रीला सुरूवात झाली त्याचे पहिले लाभार्थी म्हणून  प्रातिनिधिक स्वरूपात  बिजलाबाई निवृत्ती दळवी रा. कुंभारी, राहीबाई सुधाकर ञिभूवण रा. सुरेगाव  व रविंद्र गोरख माळी रा. शहाजापूर यांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी आडीज ब्रास वाळू देण्यात आली तर गणेश चंद्रभान पानगव्हाणे रा. माहेगाव देशमुख यांना खाजगी कामासाठी पाच ब्रास वाळू  मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.