आमदार राजळे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सुप्त गुणांना मिळाली संधी – तहसीलदार सांगडे

शेवगाव प्रतिनिधी, दि .११ : महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळायला हवा, ही संधी येथे शेवगाव सारख्या ग्रामिण भागातील महिला-मुलींना आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शेवगाव फेस्टिवल २०२४ या स्तुत्य उपक्रमातून प्राप्त झाली आहे.  सयोजकानी अतिशय नेटके नियोजन करून हा उपक्रम राबविला आहे. हे गेली तीन दिवस येथे झालेल्या विविध स्पर्धाना, शॉपींग व खानपान स्टॉलला   संपूर्ण जिल्हयातून भेटीसाठी उसळलेल्या गर्दीवरून, मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. असे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले.

जागातिक महिलादिना निमित्त शेवगाव येथे पार पडलेल्य तीन दिवसीय शेवगाव फेस्टिवल सोहळ्यात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजयी स्पर्धकांना रविवारी तहसीलदार सांगडे व त्यांच्या सुविद्य पत्नि प्रिती सांगडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
 यावेळी कु. दिव्या सिताराम काळे हिने मिस शेवगाव तर सौ. सिमा अनिल कुंदारे यांनी  बेस्ट वुमन शेवगाव हा मानाचा किताब पटकाविला आहे. त्यांना प्रत्येकी ११ हजाराचे रोख पारितोषिक, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या दोन्ही स्पर्धेसाठी तीन दिवसात तीन राऊंड मधून निवड चाचणी घेण्यात आली. पहिल्या फेरीत स्वत:ची ओळख, दुसऱ्या फेरीत टॅलेंट राऊंड आणि तिसऱ्या फेरीत बुद्धीमत्ता चाचणीचा समावेश होता. त्यात समय सुचकता, छंदाचे सादरीकरण, बुदधीमत्ता चाचणी, ऐनवेळी येणारे विषय या बाबीचा समावेश होता.

स्पर्धेचे परिक्षण प्रा. नितिन मालाणी,  मिनाक्षी शिंदे, वसुधा सावरकर, अशोक कदम यांनी केले. तर सीमा बोरुडे आणि संजय बोरुडे यांनी या स्पर्धेचे आणि शेवगाव फेस्टिवल २०२४ चे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी  माजी नगरसेवक सागर फडके, महेश फलके, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, हिरकणी महिला बचत गट, नारीशक्ती महिला बचत गट, सावित्री महिला बचत गटाच्या सर्व महिलानी विशेष प्रयत्न केले.

विविध स्पर्धेतील अन्य विजयी स्पर्धक असे –
शेवगांव बेस्ट  वुमन २०२४ – व्दितीय क्रमांक– पुरनाळे वनिता किरण ( रु ५ हजार ) तृतीय क्रमांक –  बंब प्रफुल्ला राहुल (रु ३ हजार ‘ )
मिस शेवगाव २०२४ व्दितीय क्रमांक – कु. शिंदे मयूरी पांडूरंग तृतीय क्रमांक – कु. मेहेर पूजा राजेंद्र
नृत्य स्पर्धा – १० ते १७ वयोगट – प्रथम क्रमांक – सरोदे श्रेया संजय, मुंढे ईशानी नंदकिशोर (विभागून ‘ ) व्दितीय क्रमांक – गारोळे चंचल चंद्रकांत,
तरटे वैष्णवी संजय – ( विभागून ) तृतीय क्रमांक – निकाळजे प्रतिक्षा योसेफ, कुसळकर प्राची अनिल (विभागून )
नृत्य स्पर्धा – १८ ते २८ वयोगट , खुला गट – प्रथम क्रमांक – बंब पुनम सचिन, व्दितीय क्रमांक – नांगरे गायत्री गोकुळ, तृतीय क्रमांक – काळे दिव्या सिताराम, गवते सोनल अविनाश विभागून

 प्रा. नितीन मालानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, दिपक कुसळकर यांनी सुत्रसंचलन केले तर संयोजिका सौ सिमा बोरुडे यांनी आभार मानले.