मुस्लीम समाज वधुवर परिचय मेळाव्यात ७६५ युवक – युवतींची नोंदणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ :  मुस्लिम समाजातील वधू वरांचा परिचय मेळावा शेवगाव मध्ये प्रथमच आयोजित करून समाजातील तरुण पिढीला चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून समाजापुढे आदर्श निर्माण होणार असून त्याचा समाजाला लाभ मिळणार आहे. हा अभिनव उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

         शेवगाव येथील उम्मीद सोशल फाउंडेशन व राॅयल रिश्ता मॅरेज ब्यूरो यांच्या वतीने शहरातील मदिना फंक्शन हाॅल नाईकवाडी मोहल्ला येथे आयोजित  मुस्लिम समाज  वधू – वर परिचय मेळाव्याचे शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमात राज्यासह पर राज्यातून देखील एकूण ७६५ युवक युवती आपल्या परिचय पत्रासह सहभागी झाले होते.

      संयोजकाच्यावतीने वसीम मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मौलाना मुफ्ती अब्दुल रज्जाक साहाब अध्यक्ष स्थानी होते, यावेळी  जनशक्तीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, मौलाना कलीमुल्ला काझी साहाब, माजी सभापती अरुण लांडे, केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, रिजवान शेख, फिरोज पठाण, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल, भाजप प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, अशोक शिंदे, संजय फडके, इरफान पटेल, मौलाना युनुस साहब, रामभाऊ साळवे, हाजी युसूफ पठाण, जाकिर कुरेशी, रिझवान शेख, प्यारेलाल शेख, रोहन फडके, पोष्षाअण्णा कडमिंचे, सलीम मुजावर, हाजी यूसुफ शेख, कपिल शेख, वहाब शेख, समीर शेख, राॅयल मॅरेज ब्यूरोचे प्रमुख कलिम शेख आदि मान्यवर उपस्थित होते. हाफिज मुश्ताक साहब यांनी सुत्रसंचलन केले तर शफीक मन्सुरी यांनी आभार मानले.