देवराम गायकवाड यांचे निधन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : तालुक्यातील येसगांव येथील देवराम विठ्ठल गायकवाड (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाउ, तीन बहिणी असा परिवार आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेचे कर्मचारी सतिष यांचे ते वडील होते.

त्यांच्या निधना बदद्ल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदींनी शोक व्यक्त केला.