कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र चासनळी ते संतश्रेष्ठ एकनाथ महाराज पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले असुन १९ मार्च रोजी दिंडी प्रस्थान करणार असल्याची माहिती हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, पायी दिंडीतील भाविक दरकोस दरमजल करत मायगांवदेवी, मळेगांवथडी, अंबीकानगर कोपरगाव, भोजडे, लाडगाव, शिरसगाव, जंगलीवस्ती, गंगापुर, कोकापुर, ब्रम्हगव्हाण, बोरगाव याठिकाणी मुक्कामी थांबत ३० मार्च रोजी मयुरेश्वर संभाजीनगर पेट्रोलपंपशेजारी पैठण येथे दिंडीचे आगमन होईल.
या दिंडी सोहळयात धार्मीक कार्याबरोबरच सामाजिक सांस्कृती व शैक्षणिक प्रबोधन केले जाते. जानेवारीत अयोध्येत राम मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अलौकीकरित्या संपन्न झाला. ही बाब अध्यात्मीक साक्षात्काराचा इतिहास असुन अखिल भारतीय विश्व परंपरेतील संत महात्म्यांना गौरवास्पद आहे त्यापासुन अनेकांना प्रेरणा मिळत आहे.