कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला आहे. कोपरगाव शहरातील विकास कामांना निधी कमी पडणार नाही याची काळजी घेवून करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांना ‘वैशिष्ठपूर्ण योजने’ अंतर्गत ४.०९ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
ज्या कोपरगाव शहराला कुचेष्टेने धुळगाव असे संबोधले जायचे त्या कोपरगाव शहराने मागील साडे चार वर्षात आपली धुळगाव पुसली असून विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहरात दिवसेंदिवस अमुलाग्र बदलत आहे. यामागे आ. आशुतोष काळे यांचे अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराला निधी मिळाल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्यामुळे मतदार संघासह सर्वत्र अविरतपणे विकासकामे सुरु असली तरी आ. आशुतोष काळे यांची निधी मिळविण्याची भूख मात्र शमली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघासाठी नियमितपणे निधी मिळत आहे. नुकतीच ‘वैशिष्ठपूर्ण योजने’ अंतर्गत ४.०९ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निधीतून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील जब्रेश्वर मंदिर ते आण्णाभाऊ साठे पुतळा रस्ता डांबरीकरण करणे (१.४९ कोटी),कोपरगांव बस स्टॅन्ड ते हॉटेल स्पॅन पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (४९.९९ लक्ष), प्रभाग क्र. १ मधील आय.टी.आय. कॉलेज समोरील रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (३०.९८ लक्ष), नगरपालिका हद्दवाढ भागातील नागरे पेट्रोल पंप ते ब्रिजलाल नगर रस्ता डांबरीकरण करणे (२३.२८ लक्ष), प्रभाग क्रमांक १४ मधील गोदावरी नदी ते नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे(३९.९६लक्ष),
प्रभाग क्र.७ मधील वसिम खाटिक घर ते शकील शेख घर रस्ता मजबुतीकरण करणे (१४.९४ लक्ष), गजानन नगर गोरोबा नगर रस्त्यावरील सि.डी. वर्क बांधकाम करणे (२४.९४ लक्ष), प्रभाग क्र.३ मधील सैनिकी वसतीगृह ते चित्रकला महाविद्यालय रस्ता डांबरीकरण करणे (२४.९९ लक्ष), प्रभाग क्र.३ मधील साईबाबा मंदिर ते खंडोबा मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे (१९.९९ लक्ष),
प्रभाग क्र.३ मधील ठक्कर घर ते साईबाबा मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे (९.९९ लक्ष), प्रभाग क्र.३ मधील व्यापारी धर्मशाळा दक्षिण बाजू रस्ता कॉक्रिटीकरण करणे (९.९९ लक्ष), प्रभाग क्र.८ मध्ये फकीर कुरेशी ते हाजी मंगल कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे (९.९९ लक्ष) आदी कामांचा सामावेश आहे.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या विकास कामांना आ. आशुतोष काळे यांच्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळून लवकरच कामास प्रारंभ होवून कोपरगावकरांची अडचण दूर होणार असल्यामुळे कोपरगावकरांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कोपरगाव शहराच्या प्रलंबित विकासाला चालना देण्यासाठी महायुती शासनाने निधी दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनीराज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.