कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार हे समाज्यासाठी प्रेरित करणारे होते. त्यांच्या विचाराची आज प्रेरणा घेऊन आपलं जीवन कार्य सुरू केल्यास आजही सामाज्यात विकसित क्रांती घडून सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो, असे झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीस अभिवादन होईल,असे प्रतिपादन कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
त्या, कोपरगावतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉ.आंबेडकर जयंती निमीत्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. डॉ. आंबेडकर जयंती निमीत्ताने विविध ठिकाणी मा. आ. स्नेहलता कोल्हे व युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांनी अभिवादन करून जयंती साजरी केली.
कोपरगावातील बस स्थानकात आयोजित उत्सव कमिटीच्या अभिवादन कार्यक्रमात मा.आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, कोपरगाव शहरातील बस स्थानकाच्या नुतनीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करत आज सुसज्ज असे बस स्थानकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने अभिवादन करतांना मनस्वी आनंद होत आहे. स्व.शंकररावजी कोल्हे साहेबांच्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची नेहमी छाप दिसायची. त्यांनी सदैव डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करीत आंबेडकरी जनतेची नेहमीच सेवा केली आहे, त्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी नेहमी तत्पर असायचे असे सौ.कोल्हे ताई म्हणाल्या.
सामाजिक ऐक्य आणि देशाला जगातील आदर्श घटना देणारे महामानव हे आपली ऊर्जा आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील माणसाला सर्वोच आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणारे मूल्य जनमानसात रुजविले. अतिशय प्रगल्भ अभ्यास आणि दूरदृष्टी डॉ.आंबेडकर यांनी दाखविल्याने जगात भारत एक महत्वाचा देश म्हणून नावाजला गेला.कोल्हे परिवार आणि आंबेडकरी समाज यांचे अतूट असे ऋनानुबंध आहेत अशी भावना या निमित्ताने विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी डि. आर. काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, जनार्दन कदम, शरदनाना थोरात, गोपीनाथ गायकवाड, वैभव गिरमे, जयप्रकाश आव्हाड, अल्ताफ कुरेशी, सतिश रानोडे, संदिप निरभवणे, सलिम पठाण, शफिक सैय्यद, सागर जाधव, शरद त्रिभुवन, सुखदेव जाधव, दादाभाऊ नाईकवाडे, रुपेश सिनगर, संतोष नेरे, उध्दव विसपुते, नारायण गवळी, संजय तुपसुंदर, किरण सुर्यवंशी, राजेंद्र भंडारी, केशवराव भवर, सागर राऊत, खालिकभाई कुरेशी, सचिन सावंत,
रवींद्र रोहमारे, रहिम शेख, जितेंद्र रणशुर, संतोष साबळे, परंतु नरोडे, शंकर बिऱ्हाडे,अरविंद विघे,आढाव, कैलास राहणे, सोमनाथ म्हस्के, सलिम इंदोरी, हाशम शेख, अमोल गवळी, राजेंद्र पाटणकर, फकिरमंहमद पहिलवान, इलियास शेख, शामराव आहेर, आदेश मोकळ, उत्सव कमिटीचे मिलिंद कोपरे, गवळी, चव्हाण मॅडम, शरद शिंगाडे, देठे मॅडम, गौतम खरात, आशिष कांबळे, आगार व्यवस्थापक अमोल बनकर, स्थानक प्रमुख दिघे, सहा. वरिष्ठ निरीक्षक अविनाश गायकवाड, आदींसह भीमसैनिक उपस्थित होते.
पोहेगावात युवा नेते विवेक कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या प्रसंगी नितीन औताडे, बापुसाहेब औताडे, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, रमेश औताडे, अशोक औताडे, अप्पासाहेब औताडे, सुकदेव भालेराव, रामनाथ भालेराव, रवींद्र भालेराव, शंकर औताडे, विजय भालेराव, बाबासाहेब वाघमारे, प्रमोद भालेराव, अमोल औताडे, निखिल औताडे, बाळासाहेब भालेराव, ठोंबरे गुरुजी, उपस्थित होते.
तसेच जेऊर कुंभारी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थित भिम बांधव व ग्रामस्थांना भिम जयंतीच्या शुभेच्छा देत संवाद साधला. या प्रसंगी भीमराज वक्ते, शांताराम रणशुर, दीपक गायकवाड, बाळासाहेब वक्ते, मधू अण्णा वक्ते, बापूराव वक्ते, शिवाजीराव वक्ते, अण्णासाहेब चव्हाण, बिपीन गायकवाड, बाबुराव काकडे, सुधाकर वक्ते आदींसह भिम प्रेमी, ग्रामस्थ, आणि पदाधिकारी उपस्थित होते.