महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही जगाला गरज – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. शोषणविरोधी, भेदभाव विरोधी, जातीभेदा विरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई त्यांनी नुसती लढली नाही तर ती यशस्वी देखील करून दाखवली. अशा धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक महान तत्वज्ञानी असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही जगाला गरज असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तहसील कार्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आ. आशुतोष काळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवदन केले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की,महात्मा बसवेश्वरांनी माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका, दया हाच धर्म आहे अशी शिकवण देवून स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असताना स्त्रीयांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य करून स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला व धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क मिळवून दिले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अमोल राजूरकर, प्रदीप साखरे, गिरीश सोनेकर, शिवकुमार सोनेकर, रोहित सरडे, अमोल साखरे, राहुल जंगम, शिवप्रसाद घोडके, सतीश नीळकंठ, संदीप सावतडकर, दिगंबर लोहारकर, दिगंबर भुसारे, गोपीनाथ निळकंठ, प्रमोद साखरे, किरण लड्डे, स्वाती कोयटे, मंगल सावतडकर, उज्वला सरडे, रजनी भुसारे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, राजेंद्र वाकचौरे, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे,संदीप कपिले, धनंजय कहार, मनोज नरोडे, गणेश बोरुडे, एकनाथ गंगूले, अक्षय आंग्रे, अखिल चोपदार,  नितीन साबळे, पुंडलिक वायखिंडे, विकि जोशी, शुभम गायकवाड, आकाश गायकवाड, कार्तिक थोरात, लक्ष्मण सताळे आदींसह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.