सत्ता असतांना जागा मिळवू न शकणारे जागा मिळविण्याचे श्रेय घेत आहे – दिलीप चौधरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : त्यांच्या कार्यकाळात जळगाव पासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. त्यावेळी त्यांना पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मिळविता आला नाही. ते जागा मिळविण्याचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे अशी टीका जळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिलीप चौधरी यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांवर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात दिलीप चौधरी यांनी पुढे असे म्हटले आहे की, २५-३० वर्ष कोल्हे गटाकडे असलेली सत्ता ३ वर्षापूर्वी २०२१-२२ मध्ये विखे-काळे गटाने कोल्हेकडून हिसकावली आहे. राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमचे नेते आ.आशुतोष काळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पाणी पुरवठा योजनांना शेती महामंडळाच्या जमिनी देण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेसाठी जागा मिळावी यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता.

त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्यातून या जागा मिळाल्या आहेत. मात्र, ज्यांच्याकडे २५-३० वर्षापासून जळगाव ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या होत्या. त्यावेळी त्यांना का शेती महामंडळाच्या जमिनी मिळविता आल्या नाही असा थेट सवाल दिलीप चौधरी यांनी उपस्थित करून न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायच बंद करा असा सल्ला दिला आहे. 

आम्ही प्रस्ताव पाठविला त्याचा पाठपुरावा केला याचा आमच्याकडे पुरावा आहे. मात्र, तुम्ही सत्तेत असतांना कधी प्रस्ताव पाठविले हे जळगावच्या जनतेला सांगा आणि नंतर श्रेय घ्या. आ.आशुतोष काळे यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी २ कोटी मिळवून दिले असून पिण्याच्या पाणी योजना बरोबरच जळगावचे विकासाचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावतांना जळगावमध्ये १ कोटीची रस्त्यांची कामे, चार वीज रोहित्र, मुस्लीम कब्रस्तानसाठी १० लक्ष, तलाठी कार्यालय २२ लक्ष निधी देवून मतदार संघातील इतर गावांप्रमाणे जळगावला देखील दिला आहे तो विरोधकांची जळगाव पासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना मागील पाच वर्षात मिळाला नाही. त्यामुळे उगाच श्रेय घेवून चर्चेत येण्याचा प्रयत्न करू नका असा खोचक सल्ला   दिलीप चौधरी यांनी विरोधकांना दिला आहे. 

केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता असतांना पुणतांबा पाणी योजनेसाठी १७ लाख कशासाठी भरले? पुणतांबा आणि जळगाव गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ज्या जमिनीची मागणी ग्रामपंचायत करीत होत्या. ती जमीन माजी आमदारांच्या आशीर्वादाने ज्येष्ठ कार्यकर्त्याने आपल्याच घशात घातली. पुणतांबा गावासाठी जी जागा दिली आहे. ती जागा पाणी पुरवठा योजनेच्या दृष्टीने अजिबात सोयीस्कर नाही. त्यामुळे अजूनही पाणी योजना कार्यान्वित होवू शकली नाही. याचे श्रेय विरोधक का घेत नाही? तुम्हीच आमदार, केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता असतांना पुणतांबा पाणी पुरवठा योजनेसाठी १७ लाख कशासाठी भरले हे अगोदर विरोधकांनी सांगावे व त्यांनंतर खुशाल श्रेय घ्या. कशाला न केलेल्या कामात राज्यात अव्वल होता. -अॅड.मुरलीधर थोरात (माजी सरपंच-पुणतांबा)