शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत केलेल्या आदेशानुसार पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात व अंमलदार संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रोहित येमुल, उमाकांत गावडे व मपोकॉ/प्रियंका चेमटे यांचे पथक नेमून कारवाई संदर्भात मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
गेल्या काही दिवसात अशा स्वरुपाचे गुन्हे वाढले आहेत ‘शेवगाव पोलिस ठाण्याच्या भोवताली सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय जोमात सुरु आहेत. सत्तर किलोमटर वरील जिल्हयाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना ते दिसतात पण स्थानिक पोलिसांना ते कसे आढळत नाहीत. या मागचे ‘अर्थ’ कारण लपून राहिले नसल्याची जनतेतून चर्चा आहे.
सपोनि/हेमंत थोरात यांना सादीक शेख रा. नवीन बाजारतळ, ता. शेवगांव हा त्याचे राहते घरी गांजा विक्री करतो अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या नुसार पथकाने पंच व साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन करून त्याचे राहते घरी जावुन त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे घराची पंचा समक्ष झडती घेतली असता घरातील कुलरमध्ये गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा ‘तसेच दुसऱ्या गोणीत ठेवलेला ३८ हजार ५५० रुपये किंमतीचा तीन किलो ९८० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने तो हस्तगत करुन
या बाबत आरोपी सादीक फारूक शेख (वय २८ रा नवीन बाजारतळ ) यास जेरबंद करून त्याचे विरुध्द गुन्हे शाखेचे पोकॉ शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन हे करीत आहे.