रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित् पथनाट्याद्वारे जनजागृती

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅली व पथनाट्य सादरीकरनाचे आयोजन करण्यात आले.

     रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी   शहरातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच इतर ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले.  

   जनजागृती रॅलीमध्ये, नजर हटी दुर्घटना घटी, सडक सुरक्षा जीवन रक्षा, दुर्घटना से दर भली, हेल्मेटचा व सिटबेल्टचा वापर करा जीवन वाचवा आशा घोषणा देत स्वयंसेवकांची  रॅली काढण्यात आली.

     यावेळी प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, वाहन निरीक्षक हनुमंत पारधी, सुरज उबाळे, रासेयो प्रमुख डॉ. संदीप मिरे, एन.सी.सी. प्रमुख लेफ्ट. नारायण गोरे, डॉ उषा शेरखाने प्रा. चंद्रशेखर मुरदारे, प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा.राजश्री सोनवणे व स्वयंसेवक उपस्थित होते.