वेळापुर येथे भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्ञान यज्ञाचे आयोजन


कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : वेळापुुर येथील श्री क्षेत्र श्री श्री श्री1008 धर्मनिष्ठ राजगुरू अनंत विभुषित महाराष्ट्र पिठाधिश्वर महामंडलेश्वर दत्तात्रयेरत्न महान तपस्वी शिवस्वरूप् स्वामी शिवानंदगिरी महाराज यांचे अध्यक्षतेखाली व कृपाशिर्वादाने भव्य पंचकुंडात्मक हवनयज्ञ तसेच श्रीगणेश, शिवपार्वती, नंदी हनुमान, राधाकृष्ण, विठठ्ल रूक्मीणी, गोदामाता, वरूणदेव, अग्निदेव, विश्वकर्मा देवता, संत ज्ञानेश्वर माऊली, भगावान शनेश्वर या देवतांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा तसेच नवीन मंदीराचे वास्तुपुजन वेदसंपन्न ब्रम्हवृंद यांचे वेदघोशाने स्वामिजींच्या शुभ हस्ते दि. 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 वा. संपन्न होणार आहे.

दरम्यान आठ दिवसापासुन महाराष्ट्रातील विविध नामांिकंत किंर्तनकारांचे किर्तन सेवा सुरू असुन, वेळापुर ग्रामस्थांकडुन गोरगरीबांना अखंड अन्नदान करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाची सांगता व पुर्णआहुती दि. 28 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 होणार आहे. यावेळी ह.भ.प. निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांचे काल्याचे किर्तन होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्यावतीनंे देण्यात आली आहे. परंपरागत चालत आलेल्या रितीरीवाजाप्रमाणे गोफ विणणे व देवीच्या काठीच्या पुजणाने भव्य यात्रा उत्सोव संपन्न होत आहे. सर्व भाविक भक्तांनी या हरिनाम किर्तनाचा व पुण्यपर्वाचा लाभ घ्यावा असे आवाहन वेळापुर ग्रामस्त व आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.