दुष्काळी भागात टँकर चालू करण्याची माजी आमदार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० :  गत वर्षी पर्जन्यवृष्टी अत्यल्प झाली होती. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील दक्षिण-पश्चिम भागातील गावातील पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे तालुका प्रशासनाने त्वरित पाण्याचे टॅंकर त्वरित सुरू करावी अशी मागणी कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, कोपरगाव तालुक्यात गत वर्षी पर्जन्यवृष्टी अत्यल्प झाली होती. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी खालावली आहे. त्यात उन्हाची तीव्रता ही वाढली आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पर्जन्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके जमीन दोस्त झाली होती.

त्यात उन्हाचा पारा ४० अंशाचा पुढे गेला आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोतही कमी झाले आहे. सर्व ओढे, नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील छायेतील धोंडेवाडी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, मनेगाव, काकडी- डांगेवाडी, मल्हारवाडी या गावांमध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

तरी नागरिकांसह जनावरांची तहान भागविण्याकरीता त्वरित पाण्याचे टॅंकर सुरू करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. असे निवेदन तहसीलदार संदीप भोसले याना देण्यात आले आहे. 

             याप्रसंगी तालुकाध्यक्ष कैलासराव रहाणे, कानिफनाथ गुंजाळ, अण्णासाहेब गांगवे, सोमनाथ कोल्हे आदीसह मान्यवर उपस्थित होते.