मंथनमध्ये समर्थ बडधे राज्यात १२ वा शेवगाव तालुक्यात प्रथम

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : येथील गणेश नगर मधील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीचा विदयार्थी समर्थ विजयकुमार बडधे याने मंथन स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन करून आपली मोहर उमटवली आहे. समर्थने दिडशे पैकी १२८ गुण मिळवून राज्यात १२ वा, जिल्ह्यात ७वा तर तालुक्यात प्रथम आला आहे.

समर्थला वर्ग शिक्षिका झिने, मुख्याध्यापक भालेराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या उत्कृष्ठ यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत असून   गटविकास अधिकारी राजेश कदम, गट शिक्षण अधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.