कोपरगावमध्ये १६ लाखाच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त 

 नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव – संगमनेर येथील गुटखा विक्रेत्यांना गुटखा विकण्यासाठी परराज्यातून गुटखा घेवून येणाऱ्या तिघांना नगरच्या  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापळा रचून तब्बल १६ लाखांचा मुद्देमालासह दोघांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील तिघे बेपत्ता आहेत. 

 या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कोपरगाव पासुन जवळच असलेल्या पुणतांबा चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापळा लावून बसले असता मध्यप्रदेश येथून गुटखा व सुगंधी तंबाखू पानमसाला घेवून येणारी पिकअप गाडी क्र. एम पी ४६जी. २३५७ ही गाडी आढळून आली त्या गाडीची झाडाझडती केली असता ४ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीच्या १० गोण्या विमल पानमसाला, ४८ हजार ४०० रुपये किंमतीची विमल तंबाखु २ गोण्या,

४ लाख ११ हजार ८४० रूपये किंमतीचा राम निवास सुगंधी तंबाखू मसाला १० गोण्या, १ लाख ५ हजार ६०० रूपये किंमतीची जाफरानी जर्दा २ गोण्या व ६ लाखांची पिक अप गाडीसह तब्बल १६ लाख १ हजार ४४० रुपयांच्या मुद्दे मालासह  दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात गाडी चालक राजू उत्तमराव भील रा. गवाडी ता. निवाली, जि. बडवाणी मध्यप्रदेश, नितेश राजू भाबड रा. अंबिकापुरी इंदौर मध्यप्रदेश, यांना अटक करण्यात आली तर अभय गुप्ता रा. इंदौर, योगेश कटाळे रा. कोपरगाव व किरण लामखडे रा. घारगाव ता. संगमनेर  हे या गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत अशी माहीती पोलीसांनी दिली.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी संतोष राजेंद्र खैरे यांच्या फिर्यादीवरून गुटखा विक्री करणारे व वाहतूक करणाऱ्या वरील पाच जणांवर कोपरगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

 दरम्यान कोपरगाव तालुक्यात गुटखा विक्री जोमात सुरू आहे. बडे व्यापारी कोट्यावधींचा गुटखा दररोज विक्री करीत आहेत. माञ हे बडे व्यापारी पोलीसांना का दिसत नाहीत. गुटखा विक्रीतून पोलीस प्रशासन जोमात आणि नागरीक कोमात अशी स्थीती आहे.