कोपरगावमध्ये दोन गटात हाणामारी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपगाव शहरातील गांधीनगर भागात लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यात पाचजन जखमी झाले. कोपरगाव शहर पोलिसांत एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्याने पोलीसांनी दोन्ही गटातील मारामारी करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे.

 या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब आसिफ पठाण रा. गांधीनगर याच्या फिर्यादी वरुन सनी गायकवाड, सनि मंजुळ, शंकर मोरे, वैभव कु-हाडे, राहुल चवंडके, ऋषी बारहाते, अभी बचडे व इतर ७ ते ८ जन असे बेकायदेशीर मंडळी जमवून रविवारी सायंकाळी पावने सहाच्या दरम्यान आचारी हाॅस्पिटल येथे येवून तलवार, कोयते, हाॅकी स्टीकने मारहान करून तोशीफ अकील पठाण शोयब करीम शेख, मतिन  झाकीर सय्यद, अरशद अमिन पठाण, आवेश मुश्ताक शेख, जबर मारहाण करुन जखमी केले.  लहान मुलांच्या खेळण्यावरून किरकोळ वाद झाला होता त्यावरून मारहाण केल्याची तक्रार केली आहे. 

दरम्यान  दुसऱ्या गटातील योगेश छबुराव शिंदे यांच्या तक्रारीवरून शोयब करीम शेख, अरशद अमिन पठाण, तोशीफ अकील पठाण, थीफईक शेख, फैज्यू सय्यद व इतर अनोळखी इसम सर्व राहणार गांधीनगर यांनी बॅट, लाकडी दांडक्याने मारहान केली.‌

  फिर्यादीचा भाचा हा गांधीनगर येथील शंकर गार्डनमध्ये खेळत असताना किरकोळ कारणावरून वाद झाला माञ वरील आरोपींनी येवून भाच्याला मारहान करून जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिंदे यांनी केली आहे. यावरून पोलीसांनी दोन्ही गटातील तक्रारीची नोंद घेवुन मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहे. 

 या वादामुळे शहरातील सामाजिक शांतता भंग झाली असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारामारी करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.