शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ : तालुक्यातील दहिगाव ने परिसरातील मौजे देवळाणे येथील शेतकरी अशोक क्षीरसागर यांच्या मालकीच्या तब्बल ५५ मेंढ्या शुक्रवारी सकाळी मृत अवस्थेत मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
यातील काही मेंढ्याच्या मानेला मोठ्या जखमा आढळल्या कळपात घुसून हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्यामुळे त्या मेल्या असाव्यात तर काही भितीने मेल्या असाव्यात.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी घटनास्थळी भेट देऊन वन परिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनरक्षक स्वाती ढोले, वनपाल रामदास शिरसाठ यांना दूरध्वनी द्वारे माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा करून काही मेंढ्याच शवविच्छेदन करून जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा घेऊन त्यात मेलेल्या सर्व ५५ मेंढया पुरण्यात आल्या.
यावेळी दहिगावनेचे उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांच्यासह कामगार तलाठी केदार भाऊसाहेब, आप्पासाहेब क्षिरसागर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.