शेवगाव तालुक्यात पाणी टंचाई भेडसावू लागली

शेवगाव प्रतिनिधी, दि.३० :  शेवगाव तालुक्यावर यंदा पर्जन्य राजाने अवकृपा केली असून ओढे नाले केव्हांच कोरडे पडलेत. उष्णतेने परिसिमा गाठल्याने भूगर्भातील पणी पातळी कमालीची खाली गेली असून विहिरीनी तळ गाठलेत शेवगाव पाथर्डीसह ५४ गावच्या पापी पुरवठा योजनेची मदार असलेल्या  जायवाडी जलाशयात अवघे ११ टक्के पाणी शिल्लक असल्याने हा संपूर्ण परिसरावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.

परिसरात पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चारा पाण्याची समस्या बिकट बनली आहे. तालुक्यातील आंतरवली बु, दिवटे, थाटे, मुर्शदपूर, आखेगाव, लाडजळगाव, वरखेड व सोनेसांगवी अशी आठ गावे व नजीकच्या वाडया वस्त्यासाठी आठ टँकर द्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सध्या सुरु असून ठाकूर निमगाव, ठाकूर पिंपळगाव, हसनापूर, कोनोसी, माळेगावने, अशा ५ गावाच्या टँकरचे प्रस्ताव मंजूर झाल्याने १३ गावे व त्याखालील वाड्या वस्त्या मिळून सुमारे १२ हजारावर जनतेची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. शेवगाव पाथर्डी नळ पाणी पुरवठा योजनेच्या राक्षी येथील उद्भवा वरून हे टँकर भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

याशिवाय तालुक्यातील लाऊजळगाव, सुलतानपूर बुदुक व बालम टाकळी या तीन गावातील पुरेसे पाणी असलेल्या खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय तालुक्यात ५५०  हात पंप सध्या चालू स्थितीत आहेत. या विहिरी व हातपंपामुळे काही ठिकाणची तीव्रता काही प्रमाणात रोखण्यास मदत होते. नजीकच्या काळात टँकरची संख्या आणखी अलीकडे पूर्व भागातील अनेक गावातून जनावरासाठीच्या पाण्याची देखील मागणी होत आहे.

तसेच जनावरांच्या चाऱ्याचेही दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. पाण्याचे दूर्भिक्ष लक्षात घेता नजीकच्या काळात टँकरची संख्या वाढविण्याशिवाय प्रशासनाला गत्यंतर रहाणार नाही. अशी स्थिती आहे.

कोट
परिसरावर पाणीटंचाईची आपत्ती आहे .प्रशासन त्याबाबत सतर्क असून तालुक्यातील जनतेचे पाण्यावाचून  हाल होणार नाहीत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणाद्वारे समन्वयाने मार्ग काढला जाईल .
                :          राजेश कदम
                गटविकास अधिकारी शेवगाव