पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती – डॉ. लिना देशपांडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाण म्हणून शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, वृक्षारोपन आदी विविध क्षेत्रामध्ये भारत फोर्ज कंपनीने अतिशय स्तुत्य कार्य केले आहे.  दुष्काळावर व वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी जलसंधारण व वृक्षारोपण  ही भविष्यातील सर्वात मोठी गरज  आहे. हे मर्म ध्यानी घेऊन संस्थेने गावोगावी अर्थ व तंत्रसहाय्य देवून जलसंचयाला व पर्यावरण संतुलनाला मदत करण्याचे व्रत जोपासले  आहे. नागरिकांनी देखील आपले योगदान देवून  या कामाला लोकचळवळीचे स्वरुप दयावे, असे आवाहन भारत फोर्ज कंपनीच्या सामाजिक दायीत्व विभागाच्या प्रमुख डॉ. लिना देशपांडे यांनी केले.

 तालुक्यातील सामनगावच्या ढोरा नदीवरील बंधा-याच्या खोलीकरणाचे काम भारत फोर्ज लि. च्या मार्फत करण्यात येत आहे. या कामाच्या पाहणीसाठी डॉ. देशपांडे यांचे पथक आले होते. यावेळी डॉ देशपांडे यांनी ग्रामस्थांशी  संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

 कंपनीच्या सामाजिक दायीत्व विभागाचे समन्वयक जयदीप लाड, जलदूत उमेश भालसिंग, अँड. वसंतराव कापरे, बाजार समितीचे माजी सभापती संदिप सातपुते, शिवाजी भिसे, हरिश्चंद्र वांढेकर, सरपंच आदिनाथ कापरे,उपसरपंच संगिता नजन  उपस्थित होत्या.

यावेळी देशपांडे म्हणाल्या, पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या दृष्टीने जलसंचय करणारी गावे यापुढे सर्वात श्रीमंत व संपन्न म्हणून गणली जातील. नदीला आई समजुन तिचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज आहे. जलसंधारणाच्या कामाला लोकचळवळीचे स्वरुप आल्यास आपले भविष्य अधिक सुरक्षीत होण्यास मदत होणार आहे.

    यावेळी वसंत कापरे, उमेश भालसिंग, बाळासाहेब गव्हाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रमेश कापरे, दिपक भुसारी, सचिन सातपुते, शिवाजी कापरे, आदिनाथ नजन, अनंता वांढेकर,अरुण काळे, प्रमोद कांबळे, किरण कापरे, श्रीकांत मिसाळ, समीर सातपुते, साईनाथ सातपुते, ग्रामसेवक देविदास पंडीत, भगवान कापरे, दत्तात्रय खरड, रवींद्र सातपुते, कृष्णा सातपुते, जनार्दन वांढेकर, बाबासाहेब जाधव, देव नदान कांबळे, लक्ष्मण जाधव, बाजीराव कोकाटे, दत्ता जाधव , नानासाहेब बनसोडे, अशोक उदागे,संजय बडे आदींसह सामनगाव व मळेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक संदिप झाडे यांनी तर सुत्रसंचालन राजू घुगरे यांनी केले. तर सरपंच आदिनाथ कापरे यांनी आभार मानले.