व्यापारी बांधवांनो तुमच्या सहकार्यातून विकसित कोपरगाव निर्माण करू – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : कोपरगाव शहराच्या विकासाला पूर्व पदावर आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. शहर विकासासाठी छोट्या-मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली असून यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार आहे. व्यापारी बांधवांनो असेच सहकार्य ठेवा आपण सर्वजण मिळून विकसित कोपरगाव निर्माण करू असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. 

‘आपली खरेदी, आपल्या गावात’ या संकल्पनेतून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘ग्राहक सन्मान योजने’चा बक्षीस वितरण सोहळा रविवार (दि.१७) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व सुप्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून तुमच्या प्रत्येक हाकेला साद देवून सर्व प्रकारचे सहकार्य दिले आहे. यापुढील काळातही देत राहील त्याबाबत आपण निश्चिंत रहावे.

‘आपली खरेदी, आपल्या गावात’ या संकल्पनेला प्रोत्साहन देवून त्यासाठी सुरुवात माझ्यापासून करतांना मी स्वत: देखील पत्नी चैताली समवेत आपल्या बाजार पेठेत दिवाळीची खरेदी केली. हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीच्या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर ‘ग्राहक सन्मान योजना’ असे विविध उपक्रम यापुढील काळात देखील राबवावे लागणार आहे. आ.आशुतोष काळे.

मालपाणी उद्योगाचे उद्योग व्यवसायात मोठे योगदान आहे. त्यांचे देखील मार्गदर्शन घेवून कोपरगावच्या बाजारपेठेला फायदा होणार आहे. त्याच बरोबर आपल्या शहर व तालुक्यात देखील अनेक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचे देखील आपण मार्गदर्शन घेतल्यास आपली बाजार पेठ फुलण्यास मदत होणार आहे. कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदार संघाला पुन्हा गतवैभव मिळवून देवून तालुक्याची भरभराट हा आपल्या सर्वांचा उद्देश आहे. ‘आपली खरेदी, आपल्या गावात’ या संकल्पनेला व्यापारी बांधवांचे मिळालेले सहकार्य व ग्राहकांचा मिळालेला उस्त्फुर्त प्रतिसाद पाहता आपली वाट सकारात्मक पद्धतीने सुरु असल्याचे दर्शवित आहे.

त्यासाठी यापुढील काळातही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा योजना असे प्रयोग राबवावे लागणार आहे. त्यासाठी तुमचे सहकार्य अत्यंत महत्वाचे असून तुम्ही असेच सहकार्य ठेवा येत्या काळात कोपरगावची बाजारपेठ पुन्हा कायमस्वरूपी ग्राहकांनी गजबजलेली राहील व आपला उद्देश साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने सुप्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, तुलसीदास खुबाणी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा, प्रदीप साखरे, अजित लोहाडे, राजेंद्र बंब, राम थोरे, सुमित भट्टड, मोहन उकिरडे, किरण शिरोडे, तुषार घोडके, गुलशन होडे, संदीप राशिकर, पवन डागा, संदीप काबरा, प्रदीप मुंदडा, शाम जंगम आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मेडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, गणेश बोरुडे, सोमनाथ आढाव, नारायण लांडगे, संतोष शेजवळ, अनिरुद्ध काळे आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.