ओम दहिवाळकर तालुक्यात प्रथम
शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : ‘मार्च २०२४ मध्ये झालेल्या डॉ. सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षेत पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलचा विद्यार्थी ओम अंकुश दहिवाळकर हा इ ८वीतील विद्यार्थी तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण सहा विद्यार्थी तालुका मेरीट मध्ये आले असल्याची माहिती बाळासाहेब भारदे हायस्कुलचे प्राचार्य शिवदास सरोदे यांनी दिली.
या परीक्षेला भारदेचे ३१ विद्यार्थी बसले होते. ते सर्व गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयाचा इयत्ता ८वीचा मल्हार भारदे, तर इयत्ता ९वी तील वैदेही देवणे, सिद्धी पवार व प्रणव पुंड, श्रेया घावटे या विद्यार्थ्यांनी तालुक्यात अनुक्रमे चौथा, पाचवा, सहावा व सातव्या क्रमांक मिळविले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ.सविता रोडी यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.रमेश भारदे ,शाळा समिती अध्यक्ष हरीशजी भारदे, विद्यालयाचे प्राचार्य. शिवदास सरोदे, उपप्राचार्य श्री. संजय कुलकर्णी यांनी हार्दिक अभिनंदन केलेआहे.

