लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी ॲड. मनोज कडू, सचिव डॉ. तुषार गलांडे 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या  व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब कोपरगावच्या अध्यक्षपदी  ॲड. मनोज  कडू , सचिवपदी डॉ. तुषार गलांडे तर खजिनदारपदी कैलास नागरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे क्लबच्या मेम्बरशिप कमिटीचेअरपर्सन बाबा खुबाणी, राजेश ठोळे, सत्येन मुंदडा, संदीप कोयटे आदींनी जाहीर केले. तसेच डिस्ट्रिक्टच्या एडिशनल ट्रेझरर पदी लायन्स सुधीर डागा, एडीशनल सेक्रेटरी पदी  डॉ. अभिजित आचारी व झोन चेअरमनपदी सुमित भट्टड यांची निवड झाली असल्याचे डिस्ट्रिक्ट गवर्णर ला. विजय सारडा यांनी जाहीर केले.

डिस्ट्रिक्ट (पुणे, नाशिक, अहमदनर) मध्ये कोपरगांव लायन्स क्लब सर्वात जुना ५४ वर्षापासून स्थापन झालेला व कोपरगांव तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेला क्लब आहे. लायन्स बिझनेस एक्स्पो, लायन्स मूकबधिर विद्यालय, लायन्स  पार्क, डायलिसिस युनिट, लायन्स डेंटल क्लिनिक या सारखे तब्वल बारा जनहिताचे कायमस्वरूपी उपक्रम लायन्स क्लब तर्फे राबविले जातात.

तसेच  कर्करोग तपासणी शिबिर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, विविध आरोग्य शिबिर, शालेय स्पर्धा विविध समिजक उपक्रम लायन्स क्लब मार्फत राबविले जातात.अतिशय जनहिताचे कार्य करणाऱ्या कोपरगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी ॲड. मनोज कडू, सचिव पदी डॉ. तुषार गलांडे यांची निवड झाल्याने तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा निवडी बद्दल या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.