जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूल प्रथम

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : अहमदनगर जिल्हा क्रिडा विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्हास्तरावरील फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने चमकदार कामगिरी केल्यामुळे समताच्या फुटबॉल संघाची विभागीय स्तरावर निवड झाली असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.

     अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय अंडर -१५  फुटबॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण  ३२ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचा ४ – ३ ने पराभव करत जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. 

     विजेत्या संघाच्या कर्णधार पदाची धुरा युवराज क्षीरसागर याने सांभाळली. उत्कर्ष तासकर, सार्थक मगर, ओम गाजरे, रणवीर मांजरे, शमीत पवार, सिद्धेश पाटील, रेवण महाजन, मल्हार चव्हाण, साई पिंपळे, संस्कार उंडे, धीरज पवार, अखिलेश अनभुले, रुद्र लद्दे, नंदराज पाटील व लकी लोढा यांचा समावेश होता. विजयी संघास क्रिडा प्रशिक्षक शुभम औताडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

    समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शालेय व्यवस्थापन समिती कार्यकारी संचालक संदीप कोयटे, प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा, आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रिडा प्रेमी यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.