कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : रुग्णांची राञभर प्रामाणिक आरोग्य सेवा करून काही क्षणाची विश्रांती घेण्यासाठी आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालय, कोलकत्ता येथील एका निवासी महिला डॉक्टर गेली असता ०९ ऑगस्ट रोजी काही नराधमाने बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली. हि घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. झालेली हि घटना संपुर्ण वैद्यकीय क्षेञाला धक्का देणारी निंदनीय आहे.
या घटनेच्या निषेधार्थ कोपरगांव येथे इंडियन मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, निमा, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यावतीने एक दिवसाचे काम बंद पाळून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून अहिंसा स्तंभ मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढीत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. महीला डॉक्टरवर अत्याचार करून खुन करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सर्व डॉक्टरांच्या संघटनेच्यावतीने कोपरगावचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मयुर तिरमखे, सचिव डॉ. संकेत मुळे, डॉ. योगेश लाडे, डॉ.संजय उंबरकर डॉ. गोवर्धन हुसळे, डॉ.अजेय गर्जे, डॉ.गोविंद भोसले, डॉ.विलास आचारी, डॉ.वर्षा झंवर, केमिस्ट असोसिएशनचे गणेश वाणी, राजेश श्रीमाळी, तुषार गलांडे, डॉ.संदीप मुरुमकर यांनी निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. या मूक मोर्चात कोपरगाव शहर व तालुक्यातील महिला व पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्व डॉक्टरांकडून मयत निवासी महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता केली.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली सध्या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहेत अशातच डाॅक्टरांनी एक दिवस काम बंद केल्याने तालुक्यातील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली.
एक दिवस डाॅक्टरांनी काम बंद केले तर रुग्णांची हाल झाली यावरून डॉक्टर सुरक्षित असले तरच जनता सुरक्षित जीवन जगुन शकते हे सिद्ध होते, तेव्हा डॉक्टरांची सुरक्षित तितकीच महत्त्वाची आहे.