भगवान गडचे महंत नामदेव शास्त्रीना संविधान प्रत भेट

शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ :  श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांना संविधानाची प्रत भेंट देवून अनोखा उपक्रम येथील शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने राबवण्यात आला.”संविधानाचा आदर संविधानाचा जागर” ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत ज्ञानेश्वरी प्रबोधनकार, डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना संविधानाची प्रत भेट देऊन शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाच्या वतीने अनुरोध करण्यात आला.

संतमहंताच्या अमृतवाणीने समाज प्रबोधनासाठी संविधान व मुलभूत अधिकाराची माहिती सांगणें ही काळाची गरज झाली आहे. याच उद्देशाने प्रेरित होऊन शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे व महिला आघाडी अध्यक्ष उषा शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते आदिल पाठाण यांच्या हस्ते भगवानगड खरवंडी येथे डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना भेटून संविधान उद्देशिका प्रत अर्पण करण्यात आली. 

यावेळी खरवंडीचे माजी उपसरपंच राजेंद्र जगताप, पत्रकार कृष्णा अंदुरे, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष लिलाधर पवळे उपस्थित होते.