एक कोटीची फसवणुक करणा-या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेअर मार्केटच्या नावाखाली चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून  एक कोटी एक लाख रुपयांना गंडा घालणा-या आणखी एका आरोपीस शेवगाव पोलीसांनी सापळा लावुन मध्यप्रदेशातून जेरबंद केले.

कैलास दत्तात्रय भागवत रा.एरंडगाव ता.शेवगाव याच्या विरोधात कृष्णा बाजीराव भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी २९ जुलै रोजी फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या  माहितीवरुन इंदोर (मध्यप्रदेश)येथे लपलेल्या आरोपींच्या मुसक्या शेवगाव पोलीस पथकाने आवळल्या.

चिकीस्सानगर लसुडीया पोलीस स्टेशन इंदोर येथुन आरोपीस भाड्याने राहत असलेल्या लॅाजवरुन बुधवारी (दि. १८ ) ताब्यात घेतले. त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन संबंधीत गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल लहाने, पोहेकाँ परशुराम नाकाडे, पोकाँ मोहिते, शाम गुंजाळ, संतोष वाघ,राहुल खेडकर, बाप्पासाहेब धाकतोडे, राहुल गुंडु यांनी केली असुन गुन्ह्यांचा तपास लहाने हे करीत आहेत. 

Leave a Reply