६ नोव्हेंबर रोजी आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार (दि.६) नोव्हेंबर रोजी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुनी गंगा देवी मंदिर कोपरगाव याठिकाणी सकाळी ०९.०० वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.

आ. आशुतोष काळे यांनी पाच वर्षात मतदार संघातील असंख्य विकासाची कामे मार्गी लावून जनतेच्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची दखल घेवून मतदार संघाच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत रहावी यासाठी महायुतीचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (अजितदादा पवार गट) उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे.

कोपरगाव मतदारसंघातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून आ.आशुतोष काळे यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. रस्ते, पाणी, आरोग्य, पाण्याचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो किंवा सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या अडचणींचे कुठलेही प्रश्न असो याबाबत आ.आशुतोष काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कोपरगाव मतदार संघात विकास कामे करण्याच्या दूरदृष्टीतून भरघोस स्वरूपात निधी आणला.

यातून शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये विविध योजना पोहोचविल्या. अनेक प्रलंबित कामांना मार्गी लावून विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहे. कोपरगाव मतदार संघामध्ये सुशिक्षित सुसंस्कारित असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून मतदारांचा हक्काचा कामदार आमदार म्हणून मतदारसंघात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला  आहे. मागील पाच वर्षात कोपरगाव मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावर आ.आशुतोष काळे हे पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

मा.आ.अशोकराव काळे व महायुती व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आ. आशुतोष  काळे यांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ जुनी गंगा देवी मंदिर कोपरगाव याठिकाणी सकाळी ०९.००  वाजता होणार आहे. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महायुती व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.