शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत शहरातून रॅली काढून आज पाथर्डी रस्त्यावर सांगाता सभा घेतली. यावेळी मा.आ. घुले म्हणाले, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी संपूर्ण शेवगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील जनता हे आपले कुटूंबीय या भावनेतून आयुष्यभर लोकांची सेवा केली त्यांच्या शिकवणुकी नुसार आपणही जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपले आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण करु. मतदार संघातील जनता स्वाभिमानी असून चुकीच्या माणसाच्या हाती सत्तेची चावी दिली तर ‘ पश्चाताप होतो याचा अनुभव येथील जनतेने दहा वर्षे घेतला आहे, म्हणुनच मताधिक्य देऊन विजयाचे शिल्पकार होण्याचे अवाहन त्यांनी केले.
शेवगाव येथे पार पडलेल्या जाहीर प्रचाराच्या सांगाता सभेत ते बोलत होते. माजी आमदार पांडुरंग अभंग याच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या प्रचार सांगाता सभेस माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्षितीज घुले, ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, युवानेते संजय कोळगे, माजी सभापती अरुण लांडे, ताहेर पटेल, बाळासाहेब मुंदडा, रामनाथ राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. क्षितीज घुले म्हणाले, आता थांबायचे नाही, लढायचे हा जनतेचा आदेश शिरसांवद्य मानून चंद्रशेखर घुले पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यावेळी शहर व ग्रामिण परिसरातील समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच महाआघाडीचे उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून काढलेल्या मोटर सायकल रॅलीने शेवगाव शहर दुमदुमुन गेले. तर अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे यांनी देखील जनता व्यासपिठावर जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन करत प्रचाराची सांगाता केली.
तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांनी नेवासे रस्त्यावरील दत्त मंदिरा समोर सांगाता सभा घेतली. शेवगाव पाथर्डी २२२ मतदार संघात यावेळी १५ उमेदवार उभे असले तरी पाच उमेदवारा व्यतिरिक्त अन्य कोणी उमेदवार प्रचाराच्या सांगाता निमित्त देखील कोठे आढळले नाहीत एकंदरीत जाहीर प्रचाराची सांगता उत्साहात झाली.