मनिष आव्हाटे जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदी रूजू

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव येथील आमदार आशुतोष काळे यांचे खंदे समर्थक अशोक आव्हाटे  याचे चिरंजीव मनिष अशोक आव्हाटे याने राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन राज्याच्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदी रुजू  होवून कोपरगावचे नाव उंचावले आहे.

 कोपरगाव शहरातील विद्यार्थी मनिष अशोक आव्हाटे याने नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात स्थापत्य सहायक अभियंता पदावर सरळ सेवा भरतीतुन महाराष्ट्र शासन निवड मंडळाच्या जलसंपदा  विभागात अभियंता म्हणून निवड झाली असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ लाभ क्षेत्र विकास प्राधिकरनात तो रुजू होणार आहे.

मनिष आव्हाटे याचे प्राथमिक व विद्यालयीन शिक्षण  कोपरगाव येथील श्रीमान गोकुलळचंद विद्यालयात येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात झाले तर सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण नाशिक येथील गुरु गोविंदसिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पुर्ण  झाले.

काही काळ त्याने पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर कोपरगाव येथील नगरपरिषदेच्या वाचनालयतील समता स्टडी पॉईंट येथे  अभ्यास केला. मोबाईल व सोशल मीडिया पासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्या मुळे तसेच अभ्यासात सातत्य ठेवले तर नक्कीच यश मिळते असे सांगत आपल्या यशाचे श्रेय सर्व गुरुजन, आई वडील यांना जाते असे मनिष आव्हाटे याने सांगितले. मनिष आव्हाटे याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 मी राजकीय, सामाजिक कार्य करीत असलो तरीही माझ्या मुलांकडे शिक्षणाबाबतीत बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्या जीवनाचा सुखकर मार्ग दाखवण्याचे काम वडील म्हणुन करीत होतो. मुलांनी जिद्दीने व चिकाटीने मेहनत घेवून यशाचे शिखर पार केले याचा मला सार्थ अभिमान आहे असे मत मनिष चे वडील अशोक आव्हाटे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply