अमित शहाच्या विरोधात शेवगावात सर्वपक्षीय आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ :  केंद्रीय ग्रह मंत्री अमित शहा यांनी नुकतेच संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील सर्व पक्षीय दलित संघटनेच्या व आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने सोमवारी येथील कानी चौकात आंदोलन करून  शहांचा निषेध करण्यात आला.

प्रारंभी डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून  शहाच्या प्रातिनिधिक अंत्ययात्रेचे मडके हातात  घेऊन अमित शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्च्याने क्रांती चौकात आले. त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली.

सर्व वक्तयांनी अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्याच्या विरोधात खरपूस समाचार घेत निषेध नोंदवला. त्यानंतर मोर्चात आणलेले मडके फोडून मोर्चेकऱ्यांनी बोंबा मारल्या. यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख  बंदोबस्त ठेवला होता. 

Leave a Reply