शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : भारतीय जनता पार्टीपार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते केवळ निवडणुकीच्या काळात जागे होत नाहीत. तर जनसामान्यासी ते कायम सातत्याने जोडलेले असतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत भाजपला आपल्या मतदार संघाबरोबरच देशभरात दैदीप्यमान यश मिळाले आहे.

आता होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. याकरिता प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने आपल्या ग्रुप वर किमान २०० जणांची नाव नोंदणी करावी असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी येथे केले.

जगातल्या सर्वात मोठया लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या शेवगाव मंडळ सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेचाआमदार राजळे यांचे उपस्थितीत आज बुधवारी नवीन वर्षाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आ. राजळे पुढे म्हणाल्या, भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करावा व आपल्या तालुक्यात सर्वाधिक सदस्यता नोंदणी करून त्यांना भाजपासी जोडावे, प्रथम देश, नंतर पक्ष व शेवटी स्वतः चा विचार करणाऱ्या पक्षाशी जोडले जाणे हे एक प्रकारचे राष्ट्र निर्मितीचेच कार्य आहे.

यावेळी बापुसाहेब भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष महेश फलके, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उमेश भालसिंग, भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर, महिला आघाडीच्या आशा गरड, कचरू चोथे, कासम शेख, नितीन दहिवाळकर, केशव आंधळे, राजाभाऊ लड्डा, शिवाजीराव भिसे, उषाताई संतोष कंगणकर, मिनाताई कळकुंबे, सुरेश नेमाणे, मयुर हुंडेकरी, राहुल बंब, शरद चाबुकस्वार, उमेश धस, रामकाका केसभट, सहदेव खेडकर, राजेंद्र डमाळे, संभाजी काटे, भाऊसाहेब मुरकुटे, अभय गोरे, नारायण मडके, अशोक खिळे, विक्रम बारवकर, बाळासाहेब आव्हाड, सुरेश आव्हाड, महादेव पवार, सुभाषराव बडधे, मुस्साभाई शेख, सोमनाथ कळमकर, मोहन डमाळे आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आदी उपस्थित होते. कैलास सोनवणे यांनी प्रास्ताविक, भीमराज साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर एकनाथ खोसे यांनी आभार मानले.


