श्रेय घेणाऱ्यांनी जुना इतिहास माहीत करून घ्यावा – सुभाष बर्डे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : हिंगणी येथील आदिवासी कुटुंबाला मिळालेल्या जमिनीवर पोटखराबा असल्याने त्यांना बँक कर्ज मिळण्यास अडचण येत होती. अनेक वर्षे ही समस्या सुटण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू होते. मूलतः या जमिनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी उपजीविकेसाठी आदिवासी समाजाला मिळवून दिल्या होत्या.

त्यामुळे स्थिरस्थावर आयुष्य जगण्यासाठी मदत झाली हे अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे योगदान शून्य असणाऱ्या लोकांना जुना इतिहास माहित नाही ते आमच्या जमिनी बद्दल टीका टिपण्याकरण्यात आणि श्रेय घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करता आहे. मात्र हे खरे श्रेय कोल्हे कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे आहे याची जाणीव आयतेच श्रेय घेणाऱ्यांनी माहीत करून घ्यावे अन्यथा आम्हाला खोलात जाऊन त्यांच्याबद्दल माहिती समाजासमोर ठेवावी लागेल अशी परखड भूमिका या लढ्यातील स्व.शांताराम बर्डे यांचे चिरंजीव सुभाष बर्डे यांनी मांडली आहे.

आम्हाला या जमिनी स्व.शंकरराव कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मिळवून दिल्या होत्या. त्यानंतर बिपीनदादा कोल्हे यांनी जमिनी वहिवाटीला येण्यासाठी जेसीबी आणि इतर मदत करून शेती पिके घेण्यासाठी आदिवासी समाज बांधवांना सहकार्य केले असल्याचे ते कुटुंब साक्षीदार आहेत. पोट खराबा समस्या कर्ज मिळण्यासाठी येत असल्याने विवेक कोल्हे यांच्याकडे व्यथा मांडली त्यांनंतर त्यांनी प्रशासन आणि शासन सर्व स्तरावर पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा प्रश्न सोडवून घेतला होता.

माझे वडील शांताराम बर्डे यांनी या प्रश्नात पहिल्या दिवसापासून काम केले. त्यांनी समाजासाठी या जमिनी मिळाव्या आणि पोटखराबा प्रश्न निकाली निघावा यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आम्हाला काय सत्य आहे आणि कोणी मदत केल्या आहेत हे सर्व ठाऊक आहे. केवळ सत्तेवर आहे म्हणून एखाद्या नेत्यांच्या प्रतिनिधींनी कोणाला टीका करून आमच्या जमिनीच्या विषयाचे चुकीचे भांडवल केले तर त्यांना योग्य जमिनीवर आनन्याचे काम समाज करेल हे त्यांनी विसरू नये.

सरपंच आहात म्हणून उगाच अभ्यास नसताना आणि काही माहीत नसताना कुणी तरी अर्धवट बातमी लिहून देतो ती देणे हास्यास्पद आहे. काहीही माहित नसताना दोन चार दाखले देउन श्रेय घेणारे महाशय कुठेच नव्हते तेव्हा स्व.कोल्हे साहेब यांनी या जमिनी मिळवून दिल्या होत्या.

आडात नाही तर पोहऱ्यात कुटून येणार हे कळत नसल्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या नेत्याची श्रेय घेण्यासाठी धडपड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधीना या जमिनीचा इतिहास ठाऊक नसताना अर्धवट बातम्या पेरणे बंद करावे अन्यथा आम्ही लाभधारक योग्य प्रकारे या विषयाची पोलखोल करू शकतो याचे भान त्यांनी ठेवावे असा इशारा बर्डे यांनी दिला आहे.

शांताराम बर्डे यांनी काय योगदान या विषयात दिले आहे याचा अभ्यास हिंगणी सरपंचांनी करावा आणि त्यांनी आपल्या नेत्यांना खोटे श्रेय घेण्यासाठी धडपड करू नका हा सल्ला द्यावा. कोल्हे कुटुंबाने जमिनी मिळण्यासाठी केलेला संघर्ष आम्हाला माहीत आहे त्यामुळे इतरांनी या विषयात विनाकारण श्रेय घेण्यासाठी नाक खुपसू नये असा इशाराच स्व.शांताराम बर्डे यांचे चिरंजीव सुभाष बर्डे यांनी दिला आहे.