कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणार संजीवनी युवा प्रतिष्ठान हे वेगळ्या उपक्रमांनी नावाजले जाते. युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रस्थान केले असून यासाठी शुभेच्छा देण्यास संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, फकीरमहमंद पहिलवान आदिसह मोठ्या प्रमाणावर युवासेवक उपस्थित होते.

आठ तारखेला प्रस्थान झाले असून ते नऊ तारखेला सकाळी सर्व युवासेवक शिवनेरी किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवणार असून गडकिल्ल्यांची स्वच्छता ही आपल्या अस्मितेची जपवणूक असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देणार आहेत. यापूर्वीही संजीवनी युवा प्रतिष्ठानने गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली होती. त्याच उपक्रमाचे बहुसंख्य युवकांनी अनुकरण करत पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात हजेरी लावली होती.

विविध उपक्रमातून युवकांना आदर्श विचारांची पर्वणी देण्याचे काम प्रतिष्ठान सतत करत आहे. विवेक कोल्हे यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेले हे संघटन अतिशय व्यापक कार्याने सर्वत्र लोकप्रीय होते आहे. युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि आपल्या ऐतिहासिक प्रेरणा असणाऱ्या गडकिल्ल्यांचे महत्व रुजवले जाण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजन्मोत्सव २०२५ चलो शिवजन्मभूमी चलो शिवनेरी या अंतर्गत पाच बस, अनेक चारचाकी वाहने, उन्हाळ्याचे दिवस असल्याने खबरदारी म्हणून रुग्णवाहिका आणि डॉक्टर असे सर्व ताफ्यासह मोठ्या संख्येने युवकांनी शिवनेरीकडे प्रस्थान केले आहे.
