जीवनात महिलांची भूमिका महत्वाची – स्वाती कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस.जे.एस रुग्णालयात शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती कोयटे, कोपरगाव लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा ठोळे, हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.

समाजात महिलांनी जीवन जगत असतांना आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या स्वतःची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे. आपण निरोगी राहिलो तर आपलं कुटुंब निरोगी राहील असे समजून घेणे महत्त्वाचे आहे. महिला सुशिक्षित होत आहे. त्याचबरोबर महिलांचे घटस्फोटाचे प्रमाण पण वाढत आहे. याला पुरुषच जबाबदार असतो. असे नाही त्याला महिलाही कारणीभूत असतात.

आपला कौटुंबिक वाद आपसात एकमेकांना समजून घेतले पाहिजे. जेव्हा दोघे पती पत्नी एकमेकांना समजून आपल्या आयुष्याचा प्रवास करतील तेव्हाच घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. महिलांच्या जीवनात पुरुषांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे हे आपण विसरले नाही पाहिजे. असे महिलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या स्वाती कोयटे यांनी आपल्या भाषणातून समजावून सांगितले.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन मधील साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली. फिजिओथेरपी मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या संजीवनी कोंडा, सोहेल शेख या विद्यार्थ्यांनी भरत नाट्य सादर केले होते.

यावेळी एस जे एस रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. विशाखा राठोड, एम डी मेडीसिन डॉ.सायली टोंमरे, स्त्रीरोगतज्ञ डॉ.स्नेहल भाकरे, नेत्ररोग तज्ञ डॉ.तेजस्विनी नाईकवाडे,पूजा कातकडे, बेबीताई कातकडे या कार्यक्रमासाठी इतर महिला कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास डॉ.मंजुषा गिडगे डॉ.अबोली, डॉ.तयब्बा यांचे विशेष सहकार्य लाभले.