भरधाव स्कोर्पिओ मोटार सायकलला धडक देत घुसली दुकानात घुसली, गाडीच्या धडकेत महीलेचा मृत्यु

 बेजबाबदार वाहनचालकाला पोलीसांनी घेतले ताब्यात. 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : एका वाहनचालकाने बेजबाबदारपणे गाडी चालवत मोटारसायकलवरून जाणाऱ्यांना उडवले  त्यात एका महीलेचा मृत्यू झाला तसेच थेट आपली गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसवली दुकानातील युवकाने प्रसंगावधान दाखवल्याने तो वाचला अन्यथा कहर झाला असता. हि घटना कोपरगाव जवळील एस.जे.एस हाॅस्पिटल जवळील जुन्या मुंबई – नागपूर महामार्गावर घडली.

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर एस.जे.एस हाॅस्पिटल जवळील एक हाॅटेल जवळ अचानक पांढऱ्या रंगाची स्काॅर्पिओ क्रमांक एम.एच. १२ एन झेड ००५७ हि वैजापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना संवत्सर येथील तिघे मोटारसायकलवरून वरून आपल्या आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असताना समोरच्या स्काॅर्पिओ गाडीने जोराची धडक दिली.

त्यात मोटार सायकल वरील सुनंदा साबळे वय ५५ वर्षे रा. संवत्सर ह्या गंभीर जखमी झाल्या तर त्यांच्या समवेतचे  सुदाम साबळे व अलका साबळे किरकोळ जखमी झाले यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान सुनंदा साबळे यांचा मृत्यू झाला.

हि घटना इतक्यावरच न थांबता बेधुंद स्काॅर्पिओ चालकाचे  गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडी महामार्गावर असलेल्या साई जनार्दन हाॅटेल शेजारच्या गोदावरी स्टॅलमध्ये भरधाव वेगाने घुसली दुकानातील आकाश विलास गोंदकर या युवकाने समय सुचकाता दाखवून आपला जीव वाचवत उडी मारल्याने बालंबाल वाचले तर गाडी दुकानात घुसल्याने दुकानातील अंदाजे पाच लाखांच्या साहीत्त्यांचा चकनाचुर झाला. 

सदरची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अपघातातील जखमींना तातडीने एस.जे.एस. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सुनंदा साबळे (५६) यांचे निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोघे जणांवर उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासांत स्कोर्पिओमध्ये मद्याच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. त्यामुळे चालक नशेत वाहन चालवत असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.  शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Leave a Reply