माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी होणार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती २४ मार्च रोजी असून त्या दिवशी प्रेरणा दिवस साजरा करण्याचा संकल्प श्री गणेश कारखाना व श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाने केला आहे. चेअरमन, व्हा.चेअरमन सर्व संचालक अधिकारी कर्मचारी व विद्या प्रसारकचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी यांच्या वतीने हि माहिती देण्यात आली आहे.

सर्व स्तरातील घटकांसाठी अफाट कार्य करणाऱ्या माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या जीवनातील आदर्श कार्याची शिकवण नव्या पिढीसमोर प्रेरणा बनून उभी आहे.त्यांच्या जयंती निमित्त कारखाना परिसरात प्रतिमापूज,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण करण्यात येणार आहे.यास गणेश विद्या प्रसारक संकुलात विद्यार्थ्यांच्या कल्पक विचारांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वृक्षारोपण करण्यात येईल आणि स्व.कोल्हे साहेब यांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त केले जाणार आहे.

गणेश परिसराची कामधेनु समजल्या जाणाऱ्या गणेश कारखान्याच्या जडणघडणीत मोठे योगदान त्यांचे आहे. कोपरगाव मतदारसंघाची पूर्वीची व्याप्ती लक्षात घेता गणेश परिसराचा बहुतेक भाग हा स्व.कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वात काम करत होता.अनेक पिढ्यांना ऊर्जा देण्याएवढे व्यापक कार्य त्यांचे आहे.२४ मार्च हा दिवस प्रेरणा दिवस साजरा करून अनोखी आदरांजली अर्पण केली जाणार आहे.

स्व.कोल्हे यांचे गणेश परिसरातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यात मोठे योगदान राहिले आहे.त्यांनी जोडलेला कार्यकर्त्यांचा समूह त्यांच्या पश्चात स्मरण म्हणून त्यांनी समाजविकासाचा घालून दिलेल्या मार्गाने प्रवास करत आहेत. जीवनात सकारात्मक पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा म्हणून कोल्हे यांचे व्यक्तिमत्व आणि जीवनचरित्र आदर्शवत आहे.

Leave a Reply