शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्य प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या सहीने नुकतेच त्यांना हे नियुक्ती पत्रं देण्यात आले आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नंदकुमार मुंढे मित्र मंडळ व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठया जल्लोषात त्यांचे स्वागत केले आहे.

मुंढे यांचेसी संपर्क साधला असता त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी आपण अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून समर्थपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन आपल्यावर विश्वास टाकला आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली आहे, ती आपण सार्थ ठरवू .

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारा नुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी करू. राज्यात मोठ्याप्रमाणात युवक सभासद करून संघटना अधिक बळकट करू. अशी प्रतिक्रिया मुंढे यांनी व्यक्त केली.
